एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 12 ते 20 मार्चपर्यंत ब्लॉक, पाहा वेळापत्रक
खंडाळा बोगद्याजवळ 12 मार्च ते 20 मार्च दरम्यान 15 मिनिटांचे ब्लॉक घेतले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील ब्लॉकच्या वेळा जाहीर केल्या आहेत.
पिंपरी चिंचवड : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सैल झालेली दरड हटवण्यासाठी पुन्हा एकदा ब्लॉक घेतले जाणार आहेत. खंडाळा बोगद्याजवळ 12 मार्च ते 20 मार्च दरम्यान 15 मिनिटांचे ब्लॉक घेतले जाणार आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील ब्लॉकच्या वेळा जाहीर केल्या आहेत. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना ब्लॉकच्या वेळा टाळून प्रवासाचं नियोजन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
ब्लॉकचा कालावधी
1) सकाळी 10 ते 10:15
2) सकाळी 11 ते 11:15
3) दुपारी 12 ते 12:15
4) दुपारी 2 ते 2:15
5) दुपारी 3 ते 3:15
शुक्रवार ते सोमवार या वीकेंड आणि वीकेंडभोवतालच्या दिवसात द्रुतगती मार्गावर ताण येतो. म्हणून शुक्रवार 15 मार्च दुपारी 3:15 ते सोमवार 18 दुपारी 12 वाजेपर्यंत मार्ग वाहतुकीसाठी खुला राहील.
यापूर्वीही दरड हटवण्यासाठी एक्स्प्रेस वेवर ब्लॉक घेण्यात आले होते. पावसाळ्याच्या पूर्वी एक्स्प्रेस वे वरील दरड हटवण्याचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement