पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं फडणवीसांचं आश्वासन, मात्र विद्यार्थी आंदोलनावर ठाम
MPSC Protest: जोपर्यंत कॅबिनेटमध्ये निर्णय होत नाही, तोपर्यंत विद्यार्थी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
Pune MPSC Protest : पुणे : यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी (MPSC) परीक्षा घेण्याचा नवा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान, भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी बातचीत करत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. आज कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलंय. मात्र जोपर्यंत कॅबिनेटमध्ये निर्णय होत नाही तोपर्यंत विद्यार्थी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. यूपीएससीच्या (UPSC) धर्तीवर नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. अलका टॉकीज चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 13 जानेवारीला देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. आज एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर आले आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी भाजपचे अभिमन्यू पवार आणि गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी नव्या वर्णनात्मक पद्धतीचा अभ्यासक्रम 2025 नंतर लागू करण्यासंदर्भात रोहित पवार यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले असून त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत आहेत.
रोहित पवार म्हणाले, नव्या वर्णनात्मक पद्धतीचा अभ्यासक्रम 2025 नंतर लागू करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. या वर्षीपासून अभ्यासक्रम लागू करण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्याचा मोठा फटका राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसू शकतो आणि त्यामुळेच हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या संदर्भात मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांच्यासमोर ही मागणी केली आहे. या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा. कारण विद्यार्थी संभ्रमात आहेत. शरद पवारांनीसुद्धा या संदर्भात लक्ष घातलं, मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात इतके बोलले आहेत. राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यायला हवा आणि अशा प्रकारचं आश्वासन देत आहेत. एमपीएससीने टंकलेखकाची जाहिरात काढली, मात्र त्या जाहिरातीमध्ये दुरुस्ती करणे गरजेचे आहे. एक उमेदवार सर्व विभागांसाठी परीक्षा देत असेल तर विभागवार गुणवत्ता यादी जाहीर व्हायला हवी, तरंच मुख्य परीक्षेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळेल. त्यामुळे अपेक्षा आहे की, सर्वसामान्य युवकांसाठी राज्य सरकार लवकर निर्णय घेईल.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI