एक्स्प्लोर
पुणेकराला दिसलेल्या 'एलियन'ची PMO कडून दखल
आपल्याला पुण्यात एलियन दिसले असून ते चक्क आपल्याशी संपर्क साधतात, असा दावा पुण्यातील 47 वर्षीय व्यक्तीने केला. त्याने थेट पंतप्रधान कार्यालयाला यासंदर्भात ईमेल लिहिला
पुणे : एलियन म्हणजेच परग्रहावरच्या जीवांवर आधारित अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूडमधले चित्रपट आपण पाहिले आहेत. मात्र प्रत्यक्षात हे काल्पनिक परग्रहवासी आपल्या दृष्टीस पडलेले नाहीत. पुण्यात राहणाऱ्या एका गृहस्थांनी आपल्याला एलियन दिसल्याचा दावा थेट पंतप्रधान कार्यालयाकडे केला. विशेष म्हणजे पीएमओने या ईमेलची दखल घेऊन पुणे पोलिसांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले.
आपल्याला पुण्यात एलियन दिसले असून ते चक्क आपल्याशी संपर्क साधतात, असा दावा पुण्यातील 47 वर्षीय व्यक्तीने केला. त्याने थेट पंतप्रधान कार्यालयाला यासंदर्भात ईमेल लिहिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पीएमओने याची गंभीर दखल घेत राज्य सरकारला यासंदर्भात विचारणा केली. सिंहगड रोड पोलिसांना 15 दिवसांपूर्वी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देणारं पत्र मिळालं.
काय होता ईमेल?
पुण्यातील कोथरुड परिसरात राहणाऱ्या एका इसमाला त्याच्या खोलीबाहेर मध्यरात्रीच्या सुमारास काही संशयास्पद हालचाली दिसल्या. काही एलियन्स पृथ्वीविषयी माहिती जमवत असून परग्रहावर पाठवत आहेत. त्यामुळे आपल्या देशाला धोका संभवण्याची भीती या व्यक्तीने पंतप्रधान कार्यालयाला ईमेल लिहून व्यक्त केली. पीएमओने याची तात्काळ दखल घेत राज्य सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलं.
ईमेल लिहिणाऱ्या व्यक्तीला ब्रेन हॅमरेज झाल्याचं त्याच्या पत्नीने सांगितलं. आजारपणातून त्याने हा दावा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रात्रीच्या अंधारात खिडकीतून समोरच्या झाडीमध्ये काही हालचाल दिसली, त्यावरुन तो एलियन असल्याचं समजून त्याने ही तक्रार केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकारावर आता पडदा पडला असला तरीही चर्चेचा विषय बनला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement