एक्स्प्लोर
पत्नीला शिवीगाळ केल्याने तरुणाकडून मित्राची हत्या
पत्नीला शिवी दिल्यामुळे राकेश खवळला आणि त्याने मित्र अनिलच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला.
![पत्नीला शिवीगाळ केल्याने तरुणाकडून मित्राची हत्या Pune : Man murders friend for abusing wife in Talegaon latest update पत्नीला शिवीगाळ केल्याने तरुणाकडून मित्राची हत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/08105103/Talegaon-Friend-Murder.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पिंपरी चिंचवड : पत्नीला शिवी दिल्यामुळे तरुणाने मित्राची हत्या केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून राकेश मौर्यने मित्र अनिल पानसरेचा जीव घेतला.
पुण्यातील तळेगाव भागात हत्येचा प्रकार घडला. आरोपी राकेश मौर्य हा ड्रायव्हर म्हणून काम करतो. राकेश आपला मित्र अनिल पानसरेसोबत रविवारी दारु प्यायला बसला होते.
दारु पिताना राकेशच्या पत्नीचा विषय निघाला. दारुच्या नशेत अनिलने राकेशच्या पत्नीला शिवीगाळ केली. पत्नीला शिवी दिल्यामुळे राकेश खवळला आणि त्याने अनिलच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला.
डोक्यात जोरदार प्रहार झाल्यामुळे अनिलचा मृत्यू झाला. हत्येनंतर राकेश पसार झाला, मात्र तळेगाव पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत राकेशला बेड्या ठोकल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)