Pune Leopard Attack: पुण्यातील पिंपरखेडमध्ये आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात सापडला, समोर माणसं दिसताच डरकाळी फोडली
Pune Leopard Attack: पुण्यात बिबट्या सापडला आणखी एक. पुण्यात एका बिबट्याचा खात्मा केल्यावर आणखी एक बिबट्या जेरबंद. या पट्ट्यात जवळपास 1400 बिबट्यांचा वावर आहे.

Pune Leopard Attack: पुण्यातील शिरुर तालुक्यात आणखी एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे. गेल्या दोन दिवसांत एका बिबट्याचा खात्मा करण्यात आला आहे तर दोन बिबटे (Leopard) जेरबंद करण्यात आले आहेत. ही मादी बिबट्या आहे. संतप्त ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर या मोहिमेला वेग आला आहे. वनविभागाने या परिसरात 30 पिंजऱ्यांचे जाळे रचले आहे. यापैकी पिंपरखेडमधील एका पिंजऱ्यात हा दुसरा बिबट्या (Leopard Attack) जेरबंद झाला आहे. 13 वर्षीय रोहन बोंबे याला बिबट्याने ठार मारल्यानंतर याच गावात वनविभागाने ही मोहीम राबवलेली आहे. शिरूरसह जुन्नर, आंबेगाव आणि खेड या चार तालुक्यातील बिबटे गुजरातच्या वनतारा (Vantara) आणि विविध जिल्ह्यातील वनक्षेत्रात (Forest) इथले बिबटे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी तसा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्याची तयारी ही सुरु केल्याची माहिती आहे. आंबेगाव, शिरुर, खेड आणि जुन्नर परिसरात जवळपास 1400 बिबटे आहेत. बिबट आणि मानव हा संघर्ष कमी करण्याच्यादृष्टीने ही पावलं उचलली जात आहेत. (Pune News)
Leopard News: नरभक्षक बिबट्याचा वनकर्मचाऱ्यांवर हल्ला, फायरिंगमध्ये ठार
पिंपरखेड गावाच्या परिसरातील बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वनविभागाला देण्यात आले होते. त्यासाठी वनविभागाचे पथक आणि शार्प शुटर्स या परिसरात दाखल झाले होते. नरभक्षक बिबट्याला शोधण्यासाठी या परिसरात ड्रोन्स सोडण्यात आले होते. मंगळवारी रात्री उशीरा एका ड्रोनच्या कॅमेऱ्यात नरभक्षक बिबट्या दिसला. तेव्हा वनविभागाच्या पथकाने या बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारले. मात्र, त्याचा नेम चुकला आणि बिबट्या सावध झाला. त्यानंतर नरभक्षक बिबट्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवरती उलटा हल्ला चढवला. त्यावेळी एका शार्प शुटरने बिबट्यावर तीन राऊंड फायर केले. यामध्ये नर बिबट्या ठार झाला. 13 वर्षीय रोहनचा जीव ज्या ठिकाणी घेतला तिथून 400 मीटर अंतरावर या बिबट्याला ठार करण्यात आले. हा तोच नरभक्षक बिबट्या असल्याचं त्याच्या नमुन्यांवर आणि पायाच्या ठशांवरुन स्पष्ट झाले आहे. या बिबट्याने गेल्या महिनाभरात तिघांचा जीव घेतला होता. यामध्ये दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेचा समावेश होता.
आणखी वाचा
सरकार पुण्यातील बिबट्यांची नसबंदी करणार? देवेंद्र फडणवीसांकडून स्थलांतराबाबतही महत्त्वाचं वक्तव्य
























