एक्स्प्लोर

Pune Leopard Attack: बिबट्या पिंजऱ्यात सापडल्याचं कळताच संतप्त गावकरी शेतात धावले, जागेवरच ठार करण्याची मागणी, शिरुरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Pune Leopard Attack: पकडलेल्या बिबट्याला इथंच ठार करा, अशी संतप्त मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Pune Leopard Attack: पुणे जिल्ह्यातील शिरुर परिसरात गेल्या काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्याने मोठ्या प्रमाणावर दहशत पसरवली होती. या बिबट्याने दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेचा बळी घेतला होता. त्यामुळे वनविभागाकडून या नरभक्षक बिबट्याला (Leopard ) पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होते. त्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. या बिबट्याला ठार मारण्याचे आदेशही वनविभागाने दिले होते. त्यासाठी शिरुर तालुक्यातील पिंपळखेड येथे वनखात्याचे एक पथकही दाखल झाले होते. याशिवाय, आज (मंगळवारी) मंत्रालयात यासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा जीव जाऊनही पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) याठिकाणी न फिरकल्याने स्थानिक नागरिक प्रचंड संतापले होते. तर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्यानंतर परिसरात तनावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळत असून बिबट्या जेरबंद केल्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमले असून या ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण दिसून येत आहे.

Pune Leopard Attack: जेरबंद करण्यात आलेला बिबट्या जागीचं ठार करा

पुण्यातील शिरुर तालुक्यातील जेरबंद करण्यात आलेला बिबट्या जागीचं ठार करा, असं म्हणत स्थानिक ग्रामस्थांनी एकच गोंधळ घातला. बराचवेळ हा गोंधळ सुरु झाल्यानंतर एका महिलेने आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि वनविभागाचे अधिकारी आल्यानंतर आपण पुढं ठरवू, असं संतप्त ग्रामस्थांनी निर्णय घेतला. त्यानंतर बिबट्या जेरबंद झालेला परिसर निर्मनुष्य करण्यात आला. त्यामुळं पुढचा तणाव टळला. सध्या कोणी माध्यमांसमोर ही न बोलण्याची भूमिका घेण्यात आली आहे.

Pune Leopard Attack: केंद्रीय वन विभागाच्या मदतीने वनतारा इथे बिबटे पकडून पाठवण्याचा निर्णय 

महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी याप्रकरणी भाष्य करताना म्हणाले, ऊसाचे प्रमाणे जिथे अधिक आहेत, तिथे बिबट्यांना शेल्टर मिळाले आहे. बैठकीत निर्णय घेण्यात आला आणि केंद्रीय वन विभागाच्या मदतीने वनतारा इथे बिबटे पकडून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच इतर ठिकाणी देखील पाठवणार आहोत. एक बिबट्या सकाळी सकाळी पकडला आहे. तोच नरभक्षक असावा असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. अशात त्याला लवकर वनताराला पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल. केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतील आणि बाकी काय निर्णय घ्यावा यासंदर्भात चर्चा होईल. यामध्ये एआयचा वापर देखील करणार आहोत. जेणेकरुन सायरन वगैरे वाजतील आणि नागरिक सतर्क होतील. पुण्याला जाईन पुढच्या बुधवारी मी लोकप्रतिनिधींची बैठक घेणार आहे. ७५० बिबटे आहेत, मात्र अधिक आहेत असा अंदाज आहेत. 

Pune Leopard Attack: लोकांच्या भावना तीव्र आहेत

पुढे बोलताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, वनताराच नाही, इतर वनविभागाने मागितले तर त्यांना देऊ. वनतारा ही खासगी आहे, रिलायन्सचे आहे, त्यांच्याकडे यंत्रणा आहे. इतर राज्यातील वनविभागाने जरी मागितले तरी आम्ही त्यांना बिबटे देऊ. केंद्रीय ऑथरिटी काय निर्णय घेते यावर सर्व निर्भर आहे, लोकांच्या भावना तीव्र आहेत, यामध्ये मृत्यू झालाय मी भावना समजू शकतो. अशात, वनविभागाच्या जीप जरी जाळल्या तर गुन्हा दाखल झाला असला तरी कोणाला अटक करु नका, हे मी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. वनविभागाचे ऑफिस जाळले आहे, तरी सध्याची परिस्थिती बघता कोणाला अटक करु नका हे मी सांगितलं. त्यांना समजवा हे मी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, लोकांच्या भावनापेक्षा आमच्या भावना वेगळ्या नाहीत, निदर्शने करणे हा लोकांचा अधिकार आहे, असंही वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलं आहे.

Pune Leopard Attack:  वनतारामध्ये बिबटे पाठवणार, पुरावे कसे देणार? नातेवाईकसंह ग्रामस्थांना निर्णय मान्य नाही!

पुण्यातील सर्व बिबटे गुजरातच्या वनतारा मध्ये पाठवायचे, तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याचा निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांच्या बैठकीत झालाय. पण शेतकऱ्यांना या निर्णयावर विश्वास नाही, बाराशे बिबट्यांपैकी किती बिबटे पाठवणार? फक्त शंभर? उर्वरित बिबट्यांचे काय? इथले बिबटे वनतारामध्ये पाठवले, याचा पुरावा कोण देणार? त्यामुळं आम्हाला या आश्वासनावर विश्वास नाही.  13 वर्षीय मुलाच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी याबाबत प्रस्न उपस्थित केले आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
Embed widget