एक्स्प्लोर

Pune Leopard Attack: सरकार पुण्यातील बिबट्यांची नसबंदी करणार? देवेंद्र फडणवीसांकडून स्थलांतराबाबतही महत्त्वाचं वक्तव्य

Pune Leopard Attack: पुण्यातील मंचर येथे एका नरभक्षक बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात यश आले आहे. या बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली जात आहे. पुणे- नगर जिल्ह्यात1300 बिबटे आहेत

Pune Leopard Attack: गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात नरभक्षक बिबट्याची प्रचंड दहशत पसरली आहे. गेल्या महिनाभरात बिबट्याने (Leopard) दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेचा बळी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या या पट्ट्यातील नागरिक संतप्त झाले आहे. या नागरिकांनी सोमवारी पुणे-नाशिक महामार्ग (Pune Nashik Highway) तब्बल 16 तास रोखून धरला होता.  यानंतर सरकारी पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना बिबट्यांची नसबंदी आणि स्थलांतराबाबत विचार सुरु असल्याचे संकेत दिले.

पुण्यात बिबट्यांच्या हल्ल्यानंतर जीवितहानी झाली आहे. पुणे नगर जिल्ह्यात1300 बिबटे आहेत. आमची केंद्र सरकारसोबत याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांसोबत याबाबत आम्ही नंतर चर्चा करु. मंत्रालयातील आजच्या बैठकीला दिलीप वळसे पाटीलही आले होते. या बैठकीत शिरुर, जुन्नर, खेड, आंबेगाव भागातील काही बिबटे रेस्क्यू सेंटर येथे हलवण्याबाबत चर्चा झाली. आम्ही तशी मागणी करणार आहोत. तसेच बिबट्यांच्या नसबंदीचा कार्यक्रमही आखण्याचा विचार सुरु आहे. यासाठीही आम्ही केंद्र सरकारकडून परवानगी मागणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Pune News: जुन्नर परिसरातून बिबट्यांचे वनताराला स्थलांतर करण्याचा विचार

राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी मंत्रालयात बिबट्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेतली. यावेळी पुण्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन जुन्नर परिसरातून बिबट्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय वनमंत्र्यांनी घेतला. जुन्नर परिसरात बिबट्यांची संख्या जास्त आहे. अशात बिबटे इतर राज्यातील वनविभागांनी मागणी केल्यास त्यांना दिले जाणार. काही बिबटे वनताराला पाठवण्यात येतील. नरभक्षक बिबट्याला वनताराला पाठवण्याचे वनविभागाचे नियोजन आहे. यासाठी केंद्र सरकारसोबत लवकरच बैठक पार पडणार आहे. केंद्रासोबतच्या बैठकीनंतर बिबट्यांच्या स्थलांतराचा निर्णय होईल. 

 मात्र, त्याआधी जुन्नर आणि त्या परिसरात असलेल्या बिबट्यांसंदर्भात उपाययोजना करण्यावर भर दिला जाईल. ज्यात, पिंजरे बसवण्याची संख्या वाढवली जाणार, सोबतच इतर उपाययोजना करण्यात येतील. दरम्यान, वनविभागाचे ऑफिस आणि जीप जाळल्याप्रकरणी कोणालाही अटक न करण्याचे निर्देश यावेळी वनमंत्र्यांनी दिले. गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सध्याच्या परिस्थितीत न करण्याच्या सूचना  वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जुन्नर परिसरात जवळपास 750 बिबटे आहेत. या बिबट्यांचे स्थलांतर करताना नेमक्या मार्गदर्शक सूचना कशा पाळल्या जाणार? यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 

Pune News: वनतारासह विविध राज्यात बिबटे पाठवणार, पुरावे कसे देणार? नातेवाईकांसह ग्रामस्थांना निर्णय मान्य नाही

ऍंकर : पुण्यातील सर्व बिबटे गुजरातच्या वनतारासह विविध राज्यात वन क्षेत्रात पाठवायचे, तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याचा निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांच्या बैठकीत झाला. पण शेतकऱ्यांना या निर्णयावर विश्वास नाही. 1200 बिबट्यांपैकी किती बिबटे पाठवणार? फक्त शंभर? उर्वरित बिबट्यांचे काय? इथले बिबटे वनतारामध्ये पाठवले, याचा पुरावा कोण देणार? त्यामुळं आम्हाला सरकारच्या या आश्वासनावर विश्वास नाही, असे स्थानिक गावकऱ्यांनी म्हटले.

आणखी वाचा

बिबट्या पिंजऱ्यात सापडल्याचं कळताच संतप्त गावकरी शेतात धावले, जागेवरच ठार करण्याची मागणी, शिरुरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, जानेवारीचे 1500 रुपये देण्यास मज्जाव, निवडणूक आयोगाचा निर्णय
मोठी बातमी, लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा, जानेवारीचे 1500 रुपये देण्यास मज्जाव
Embed widget