Pune Ganeshotsav 2023 : पुणे विसर्जन मिरवणूकीचा गोंधळ कायम, मंडळांचा क्रम सांगण्यास पोलिसांचा नकार; बंद रस्ते, पर्यायी रस्ते अन् संपूर्ण विसर्जनाचं नियोजन एका क्लिकवर...
पुणे विसर्जन मिरवणूकीचा गोंधळ कायम राहिला आहे. मंडळांचा क्रम सांगण्यास पोलिसांचा नकार दिला आहे. तर शहरातील अनेक मार्ग बंद असणार आहे मात्र त्यासाठी पर्यायी मार्गाची सोय करुन देण्यात आली आहे. सोबतच 9000 पोलीस मिरवणुकीच्या दिवशी तैनात असणार आहे.
पुणे : पुण्यातील कुठल्या गणपतीचा विसर्जन मिरवणुकीतील क्रम कोणता (Pune Ganeshotsav 2023) असेल हे पुणे पोलिसांनी जाहीर केले नाही. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून यावर्षी साडेचार वाजताच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असल्याच जाहीर केलं आहे. मात्र दगडूशेठ मंडळाचे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणे इतर मंडळांकडून विसर्जन मिरवणुकीत किती वेळ लागणार यावर अवलंबून असणार आहे. कारण पाच मानाच्या गणपतींनंतर इतर गणपती मंडळांना दगडूशेठच्या आधी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास परवानगी देण्यात येणार असल्याच जाहीर केलं आहे.
कोणतं मंडळ कोणत्या क्रमांकावर सहभागी होईल सांगण्यास पोलिसांचा नकार...
त्याचबरोबर पुण्यातील अखिल मंडई, बाबू गेणू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि राजाराम मंडळाकडून साडेसात नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असल्याच जाहीर केलं आहे. मात्र इतर मंडळांना किती वेळ लागेल यावर या मंडळांना किती वेळ लागेल हे ठरणार आहे. महत्वाचे म्हणजे विसर्जन मिरवणुकीत कुठले मंडळ कुठल्या क्रमांकावर सहभागी होईल हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
2000 गणपती मंडळांचं विसर्जन, 9 हजार पोलीस तैनात
पुण्यात दिमाखात गणेशोत्सव साजरा केला जातो. हाच उत्सव नीट पार पाडण्याची जबाबदारी पुणे पोलिसांची असते. 10 दिवस उत्तम कामगिरी पार पाडल्यानंतर पुण्यातील गणपतीच्या मिरवणुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. यात 29 सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्थीच्या दिवशी पुण्यातील काही रस्ते बंद करण्यात आले. 28 तारखेला होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात बीडीडीएस पथके, आरसीपी, क्युआरी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. 28 तारखेला जवळपास 2000 सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होईल. विसर्जन मिरवणुकीसाठी 9 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा बंदोबस्त असणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष मिरवणूक मार्गावर असणार आहे, अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे
पु़णे विसर्जनाच्या दिवशी वाहतुकीसाठी बंद असलेले रस्ते
शिवाजी रोड
लक्ष्मी रोड
बाजीराव रोड
कुमठेकर रोड
गणेश रोड
केळकर रोड
टिळक रोड
शास्त्री रोड
जंगली महाराज रोड
कर्वे रोड
फर्ग्युसन रोड
भांडारकर रोड
पुणे सातारा रोड (व्होल्गा चौक ते जेधे चौक)
सोलापूर रोड (सेव्हन लव चौक ते जेधे चौक)
प्रभात रोड (डेक्कन पोलीस स्टेशन ते शेलारमामा चौक)
बगाडे रोड (सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक)
गुरु नानक रोड (देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक)
वाहतुकीत बदल करण्यात आलेले मार्ग
1) जंगली महाराज रोड-शी राणी चौक
2) शिवाजी रोड का
3) मुदलीयार रोड : अपोलो बीज / दारुवाला पुल
4) लक्ष्मी रोड-संत कबीर पोलीस चौकी
5) सोलापूर रोड ते लबज चौक
6) सातारा रोड-व्होल्गा चौक
7) बाजीराव रोड- सावरकर पुतळा चौक
8) लाल बहादुर शास्त्री रोड :- सेनादल पोलीस चौकी
9) कर्वे रोड स्टॉप
10) फर्ग्युसन कॉलेज रोड गुडलक चौक
सारथी गणेशोत्सव गाईड 2023चे फलक
गणेशोत्सव कालावधीत लोकांना वाहतुकीस अडथळा होवु नये यासाठी वाहतुकाच करण्यात आलेले आहेत. नागरिकांना त्यांची वाहनं सुरक्षितपणे पार्किंग करण्याचं आवाहन कऱण्यात आलं आहे. तसेच नागरिकांना वाहतुक मार्गदर्शनासाठी "सारथी गणेशोत्सव गाईड 2023" चे फलक जागोजागी लावण्यात येत आहेत. गणेशोत्सव 2023 मधे पुणे शहरातील मुख्य मिरवणुकांच्या मार्गावर गणेशभक्तांच्या सोईसाठी आणि मार्गदर्शनासाठी नागी एल.ई.डी स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत.
रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्ग
या कालावधीत काही अनुचित घटना घडू नये यासाठी गोपनिय यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. चेनस्नैचिंग, महिला छेडछाड रोखण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके तैनात करण्यात आलेली आहेत. लहान मुले वयोवृद्ध यांचे सहाय्यतेसाठी मदत केंद्र उभारण्यात आलेली आहेत. इमर्जंसी परिस्थीतीमध्ये अॅम्बुलंन्ससाठी स्वतंत्र मार्ग नियोजीत करण्यात आलेले आहेत.