एक्स्प्लोर

Pune dagadusheth ganpati 2023 : द़गडूशेठ गणपतीची क्रेझ सातासमुद्रापार, परंपरेला सोशल मीडियाची जोड; 56 लाखांहून अधिक भक्तांनी घेतलं Online दर्शन

सातासमुद्रापार द़गडूशेठ गणपतीची क्रेझ पाहायला मिळत आहे. 56 लाखांहून अधिक भक्तांनी Online दर्शन घेतलं आहे. फेसबुकवरुन, इन्स्टाग्रामवरुन अनेकांनी दर्शन घेतलं आहे.

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Shrimant dagdusheth ganpati) क्रेझ सातासमुद्रापार गेली आहे. नेपाळ, अमेरिका, थायलंड, कॅनडा, इंडोनेशिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आदी देशांमधून वेबसाईट, फेसबुक, यू ट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटरसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सोशल मीडियावर तब्बल 56 लाखांहून अधिक गणेशभक्तांनी गणपतीचे दर्शन घेतले आहे. केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील गणेशभक्तांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे आकर्षण आहे. प्रत्यक्ष गणपतीचे दर्शन घेता आले नसले, तरी ऑनलाईन माध्यमातून उत्सवाचा आनंद जगभरातील भाविक घेत आहेत. ट्रस्टतर्फे दर्शाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षीचा गणेशोत्सव सुरु आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ट्रस्टतर्फे विविध कार्यक्रम सुरु झाले. तेव्हापासून ट्रस्टच्या वेबसाईटवरुन हजारो भाविक दर्शन घेत आहेत. वेबसाईटवरुन दररोज सकाळी आणि रात्री होणारी लाईव्ह आरती आणि दर्शन देखील गणेशभक्त घेत आहेत.
 
भारतातील पुण्यासह मुंबई, दिल्ली, नागपूर, नाशिक, ठाणे, गुजरातमधील अहमदाबाद, सूरत, कोल्हापूर, नेपाळमधील काठमांडू आदी शहरांमधून आॅनलाईन पद्धतीने बाप्पांचे दर्शन घेण्यात आले आहे. तसेच नेपाळ, अमेरिका, थायलंड, कॅनडा, इंडोनेशिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील भक्तांनी दगडूशेठ च्या श्रीं चे दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या सोशल मीडियावर भेट दिली आहे.
 
सुमारे 34 लाख 69 हजार भाविक फेसबुकवरुन, इन्स्टाग्रामवर 21 लाख 77 हजार यांसह 18 हजारहून अधिक यूटयूब व अ‍ॅप वरुन देखील गणेशभक्तांनी भेट दिली आहे. यामुळे यंदाच्या गणेशोत्सव काळात आजपर्यंत तब्बल 56 लाखांहून अधिक गणेशभक्तांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेतला आहे. डिजीटल माध्यमातून ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांना देखील भक्त जोडले गेले आहेत.
 
उत्सवकाळात भारतासह परदेशातील गणेशभक्तांना घरच्या घरी श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली असून ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर उत्सवकाळात 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन सुविधांचा देखील लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

पुणेकरांचीही रात्रंदिवस गर्दी...

 पुणेकरांचा लाडका गणपती असणाऱ्या दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकर रोज मोठी गर्दी करत आहे. हजारोंच्या संख्येने पुणेकरच नाही तर राज्यातील अनेक लोक पुण्यात दाखल होत आहेत. त्यांच्यासोबतच सेलेब्रिटी आणि नेतेमंडळीदेखील दर्शनासाठी हजेरी लावत आहे.

इतर महत्वाची बातमी-

hau Rangari Ganpati : इंग्रजांनाही न कळलेली जागा; पुण्यातील भाऊसाहेब रंगारी वाडा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PMAnandache Paan : माणूस 'असा' का वागतो? पुस्तकाच्या लेखिका Anjali Chipalkatti यांच्यासोबत खास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Embed widget