एक्स्प्लोर

Dattatray Ware: बदली झाल्यानंतरही दत्तात्रय वारे गुरूजींचं काम जोमात, जालिंदरनगरच्या शाळेचाही कायापालट

Dattatray Ware Guruji News: आंबेगाव तालुक्यातील आदिवासीबहूल मोडक्या तोडक्या स्थितीत असलेल्या शाळेचा वारे गुरूजींनी कायापालय केला. 

Dattatray Ware Guruji News: महाराष्ट्रात काय सुरु आहे असा प्रश्न कुणालाही विचारला तर प्रत्येक जण एकच उत्तर देईल.. ते म्हणजे राजकारण.. सध्या खातेवाटप, विस्तार, नाराजी, बैठका, दिल्लीवारी याच चर्चा प्रत्येकाच्या तोंडी आहेत. सोशल मीडियाच्या व्हिडीओमध्येही हेच शब्द ट्रेंडिंगमध्ये आहेत. एकीकडे अशी सगळी स्थिती असताना दुसरीकडे एकमेकांवर राजकीय चिखलफेकही जोरात सुरु आहे. राजकीय वातावरण इतकं गढूळ झालेलं असतानाच काही लोक मात्र ध्यानस्थ वृत्तीनं आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतायत. पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी गावातील आदर्श शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे हे त्यापैकीच एक. 

चारही बाजूंना पसरलेलं माळरान आणि मधोमध असलेली ही शाळा. वाईटातून काहीतरी चांगलं होतं असं म्हटलं जातं. या सुंदर शाळेची उभारणी अशा वाईट प्रसंगातूनच झालीय. वाबळेवाडीची सुंदर शाळा उभारणाऱ्या वारे गुरुजींवर गावच्या राजकारणातून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. जिल्हा परिषदेतून त्यांचं निलंबन घडवून आणण्यात आलं. मात्र वारे गुरुजींवरील आरोपांमध्ये तथ्य नसल्यानं जिल्हा परिषदेला निलंबन मागे घ्यावं लागलं. 

गुरुजींची आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बदली करण्यात आली. दोन गळक्या खोल्या, अवघे सात ते आठ विद्यार्थी... वारे गुरुजी मागील वर्षी जेव्हा इथं आले तेव्हा जालिंदर नगरच्या या शाळेची ही अशी अवस्था होती. वारे गुरुजींनी गावकऱ्यांना साद घातली. जालिंदर नगरचे गावकरी सरसावले, काही दानशूर उद्योजक पुढे आले आणि जालिंदर नगरच्या या शाळेचा कायापालट झाला. वाबळेवाडीसारखीच सुंदर आणि चकचकीत शाळा उभी राहिली आणि विद्यार्थ्यांची संख्या आठवरून थेट शंभरच्या पुढं गेली. 

पण ही शाळा नुसती चकचकीत नाही तर अभिनव देखील आहे. या शाळेत न खोली आहे न बेंच आहेत, न फळा आहे न वह्या पुस्तकं. सगळं काही हसत - खेळत शिकवायचं असा वारे गुरुजींचा आग्रह. 

चौथीच्या पुढं इयत्ता वाढवून मिळाव्यात यासाठी वारे गुरुजींचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषदेकडे तसा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. निदान यावेळी तरी राजकारण्यांनी अडथळे घालू नयेत म्हणजे मिळवलं. 

एकीकडे सरकार, सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून सातत्याने बोलत असते. अशा वेळी जिल्हा परिषदेची शाळेला जर चांगला शिक्षक मिळाला तर ती किती प्रभावी होऊ शकते, खाजगी शाळेलाही मागे टाकत आंतरराष्ट्रीय दर्जा निर्माण करू शकते हे वारे गुरूजींनी एकदा नव्हे तर दोनदा दाखवून दिलं आहे.  

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil on Raju Shetti : राजू शेट्टींच्या आरोपावर आता सतेज पाटलांनी सांगितलं कोणाशी बोलणं झालं? जयंत पाटलांवरही बोलले!
राजू शेट्टींच्या आरोपावर आता सतेज पाटलांनी सांगितलं कोणाशी बोलणं झालं? जयंत पाटलांवरही बोलले!
Marathi Serial Punha Kartavya Aahe : किती घाण आहे ही मालिका! 'पुन्हा कर्तव्य आहे' सीरियलच्या प्लॉटवर प्रेक्षक संतापले
किती घाण आहे ही मालिका! 'पुन्हा कर्तव्य आहे' सीरियलच्या प्लॉटवर प्रेक्षक संतापले
Satej Patil : विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का? सतेज पाटलांचा गंभीर आरोप
विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का? सतेज पाटलांचा गंभीर आरोप
CET चा निकाल लागला, आता तरी GR काढा; मुलींच्या मोफत शिक्षणावरुन मनसे आक्रमक, ठाकरेंचं पत्र
CET चा निकाल लागला, आता तरी GR काढा; मुलींच्या मोफत शिक्षणावरुन मनसे आक्रमक, ठाकरेंचं पत्र
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Rohit Pawar vs Ajit Pawar : अजित पवारांचं कुटुंब वेगळं, अजित पवार गटात काहीच अलबेल नाही : रोहित पवारRavi Rana PC : पत्नीच्या पराभवाची जबाबदारी रवी राणांनी स्वीकारली; कडूंवर हल्लाबोलTOP 50 : दुपारच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 13 June 2024 : ABP MajhaPune Alandi Accident : थेट गाडीच अंगावर घातली,अल्पवयीन चालकाचा प्रताप,पुण्यातील अपघाताचा व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Raju Shetti : राजू शेट्टींच्या आरोपावर आता सतेज पाटलांनी सांगितलं कोणाशी बोलणं झालं? जयंत पाटलांवरही बोलले!
राजू शेट्टींच्या आरोपावर आता सतेज पाटलांनी सांगितलं कोणाशी बोलणं झालं? जयंत पाटलांवरही बोलले!
Marathi Serial Punha Kartavya Aahe : किती घाण आहे ही मालिका! 'पुन्हा कर्तव्य आहे' सीरियलच्या प्लॉटवर प्रेक्षक संतापले
किती घाण आहे ही मालिका! 'पुन्हा कर्तव्य आहे' सीरियलच्या प्लॉटवर प्रेक्षक संतापले
Satej Patil : विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का? सतेज पाटलांचा गंभीर आरोप
विधानसभा निवडणुकीआधी कोल्हापुरात वातावरण बिघडवायचं आहे का? सतेज पाटलांचा गंभीर आरोप
CET चा निकाल लागला, आता तरी GR काढा; मुलींच्या मोफत शिक्षणावरुन मनसे आक्रमक, ठाकरेंचं पत्र
CET चा निकाल लागला, आता तरी GR काढा; मुलींच्या मोफत शिक्षणावरुन मनसे आक्रमक, ठाकरेंचं पत्र
मोठी बातमी : पूर्व विदर्भ जिंकण्यासाठी भास्कर जाधवांचा खास प्लॅन, मविआमध्ये शिवसेनाच नंबर वन असल्याची आठवण!
मोठी बातमी : पूर्व विदर्भ जिंकण्यासाठी भास्कर जाधवांचा खास प्लॅन, मविआमध्ये शिवसेनाच नंबर वन असल्याची आठवण!
Nashik News : त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांची 'भाईगिरी'; भाविकांना धक्काबुक्की अन् मारहाणीचा आरोप
त्र्यंबकेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकांची 'भाईगिरी'; भाविकांना धक्काबुक्की अन् मारहाणीचा आरोप
Sangli News : टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल! जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम-विशाल पाटलांना डिवचलं!
Prakash Ambedkar: उद्धव ठाकरेंची 'ती' गोष्ट खटकली, प्रकाश आंबेडकर संतापून म्हणाले, दलित-बौद्धांनो आतातरी शहाणे व्हा!
उद्धव ठाकरेंची 'ती' गोष्ट खटकली, प्रकाश आंबेडकर संतापून म्हणाले, दलित-बौद्धांनो आतातरी शहाणे व्हा!
Embed widget