Pune Crime News: 'तू माझ्याकडे बघत जा...', शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; पुण्यातील हडपसरमधील शाळेतील घटना
Pune Crime News: शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार हडपसर भागात सोमवारी घडला. या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध पोलिसांनी पॉक्सो त्याचबरोबर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या मोठ्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. अनेक शाळांमध्ये लहान मुलींचं समुपदेशन केलं जात आहे. असं असतानाच पुण्यातील हडपसर भागात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणार्या मुलीचा शिक्षकाने विनयभंग (Pune Crime News) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध हडपसर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉक्सो) त्याचबरोबर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल (Pune Crime News) केला आहे.
गणेश काकड असं आरोपी शिक्षकाचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील एका शाळेत इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणार्या एका अल्पवयीन मुलीला (Pune Crime News) आरोपी शिक्षक गणेश काकड याने जुलै 2024 मध्ये घरचा पत्ता विचारला. नंतर मी वर्गामध्ये शिकवत असताना तू माझ्याकडे बघत जा, इकडे तिकडे बघत जाऊ नकोस. मी सुंदर आहे असे पीडित मुलीला आरोपी शिक्षकांनी वाटेत अडवून बोलत त्रास दिला. त्यावर पीडित मुलीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर शाळेतून पीडित मुलगी घरी जात असताना, तू घरी चालली आहेस का ? मी तुला तुझ्या घरी सोडू का ? तू कुठे राहतेस ? अशी विचारणा करून तिला त्रास (Pune Crime News) द्यायला सुरुवात केली. मुलगी २६ ऑगस्ट रोजी घरी परतली तेव्हा रडत होती. आईने विचारले असता तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या प्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली. हा प्रकार जुलै ते 26 ऑगस्ट दरम्यान घडला.
26 ऑगस्टच्या दिवशी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही अल्पवयीन मुलगी शाळेच्या मैदानावरती उभी होती तेव्हा आरोपी शिक्षक काकड तिच्या जवळ आला आणि तू शिट्टी का वाजवली ? अशी विचारणा करत त्याने तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही पुढील काही दिवस आरोपी शिक्षक गणेश काकडने पिडीतेला सातत्याने त्रास देणे सुरूच ठेवले. हा संपूर्ण प्रकार पीडित (Pune Crime News)मुलीने आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलगी आणि तिच्या आईने पोलीसात तक्रार दाखल केली. आरोपी गणेश काकड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणाबाबत अधिक तपास सुरु असल्याचे पोलीसांनी सांगितले.
शाळेच्या उपप्राचार्यांनी घेतली नाही घटनेची दखल
अल्पवयीन विद्यार्थिनीने आरोपी शिक्षक काकडविरुद्ध उपप्राचार्यांकडे तक्रार (Pune Crime News) दिली होती, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही, असे मुलीच्या आईने फिर्यादीमध्ये म्हटले आहे. आरोपी शिक्षक काकडने तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.मुलगी शाळेच्या मैदानावर होती. त्यावेळी काकड तेथे आला. त्याने पुन्हा असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.