Pune Crime News : पुण्यातील शिवाजी नगर अन् पुणे स्टेशन बॉम्ब टाकून उडवून देईन; माथेफिरुचा कंट्रोल रुमला फोन
पुण्यातील शिवाजी नगर आणि पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा फोन पुन्हा एकदा कंट्रोल रुमला आला.एका माथेफिरुने ही धमकी दिली होती. पोलिसांनी काही तासांतच या माथेफिरुच्या मुसक्या आवळल्या आहे.
पुणे : पुण्यातील (Pune News) शिवाजी नगर (Shivaji Nagar)आणि पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) बॉम्बस्फोट (Bomb Blast) करण्याची धमकी देणारा फोन पुन्हा एकदा कंट्रोल रुमला आला. त्यामुळे पुण्यातील या तिन्ही परिसरात मोठी खळबळ उडाली. एका माथेफिरुने ही धमकी दिली होती. पोलिसांनी काही तासांतच या माथेफिरुच्या मुसक्या आवळल्या आहे.
पुण्यातील शिवाजी नगर आणि पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवड परिसर उडवून देईल, असा फोन पुण्यातील कंट्रोल रुमला आला. हा फोन आल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली. त्यांनी लगेच तिन्ही परिसरात पाहणी केली मात्र हा धमकीचा कॉल करणारा माथेफिरू असून अफवा पसरवल्याचं पोलीस तापासात उघड झालं. कॉल करणारा व्यक्ती हा हडपसर भागात राहणारा असून तो माथेफिरू असल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या माथेफिरुने उडवून दिलेल्या अफवेमुळे काहीवेळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.
पुण्यात यापूर्वीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. त्यात पुणे स्टेशन, विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचे कॉल्स नियंत्रण कक्षाला आले आहेत. त्यासोबतच बॉम्बने पुणे स्टेशन उडवून देण्याच्या धमक्यादेखील आल्या आहेत. या अशा धमक्यांमुळे संपूर्ण पोलीस पथक कामाल लागतं त्यासोबत बॉम्बशोधक आणि नाशक पथकदेखील कामाला लागतं. मात्र अनेकदा हे फोन आणि धमक्या फेक असल्याचं समोर येतं. त्यामुळे आता या सगळ्या फोन करणाऱ्यांचा तपास करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
फेक फोन करणाऱ्यावर कडक कारवाई होणार
आतापर्यंत अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत. या घटनेमुळे पुण्यात अनेकदा पोलिसांची आणि नागरिकांचीदेखील ताराबळ उडते. काही वेळा असे फोन मध्यरात्री आल्याचं पोलीस सांगतात त्यावेळी मध्यरात्री पोलिसांना अनेक पथकं कामाला लावावी लागतात. त्यासोबतच बॉम्ब पथकंदेखील कामाला लागतात. परिणामी हा सगळा गोंधळ पाहून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण होतं. या माथेफिरुच्या एका फोनमुळे अनेकांच्या डोळ्यावरची झोप उडले. साधारण हे माथेफिरु कोणत्या भागातील आहे? ते काय करतात? असे धमकीचे फोन करुन साधारण काय साध्य करण्याचा प्रयत्न करतात?, याचा तपास आता पुणे पोलीस करणार आहेत आणि अशा माथेफिरुंवर कडक कारवाईदेखील करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
इतर महत्वाची बातमी-