Pune crime News :गुप्तांगाला कुलूप, भररस्त्यात खून अन् दारु पाजून बलात्कार; पुण्यात गुन्हेगारीचा कळस, अशी अघोरी मानसिकता येते कुठून?
पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीने कळस गाठला आहे. त्यात मागील दोन दिवसांत पुण्यात अघोरी, अमानवी आणि दहशत निर्माण करणाऱ्या घटना समोर आल्या आहेत.
पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीने (Pune crime News) कळस गाठला आहे. त्यात मागील दोन दिवसांत पुण्यात अघोरी, अमानवी आणि दहशत निर्माण करणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. गुप्तांगाला कुलूप, रस्त्यावर मारहाण तर कधी थेट अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटना एकाच दिवशी समोर आल्याने पुणे शहर चांगलंच हादरलं आहे. शिक्षणाचं माहेर घर असलेल्या पुणे, आयटी हब असणारं पुणे वाढत्या लोकसंख्येमुळे गुन्हेगारीचं हब बनत चाललं आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.
शिवाय पुण्यात बलात्काराच्या घटना आणि छेडाछेडीच्या घटनांचीदेखील मोठी रांग आहे. त्यात भररस्त्यात दहशत निर्माण करुन मुलींना अडवून त्यांची छेडछाड करण्याचे प्रकारही काही नवीन नाही. त्यामुळे शिक्षण आणि नोकरीसाठी पुण्यात आलेल्या मुली आणि महिला खरंच सुरक्षित आहेत का? ही अघोरी आणि निच गुन्हेगारीची मानसिकता येते कुठून?, असादेखील प्रश्न आ फाडून उभा ठाकला आहे.
गुप्तांगाला कुलूप, मर्डर अन् बलात्काराने पुणे हादरलं!
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मारहाण करत तिच्या गुप्तांगाच्या बाजूला दोन होल करुन कुलुप लावल्याचा प्रकार समोर आला आणि पोलिसही चक्रावले. कुलुप लावलं आणि चावी सापडत नसल्याने पत्नी वेदनांनी विव्हळत होती. शेवट डॉक्टरांनी कुलूप कापलं आणि पत्नीच्या वेदना काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केला. वाकडमध्ये राहणारे हे दाम्पत्य मूळचे नेपाळमधील आहे. आरोपीचं नाव उपेंद्र हुडके असे आहे. तो मूळचा नेपाळमधील बाचकुट या गावातील आहे. पत्नीच्या चारित्र्यावर पती सतत संशय घेत असे. यातूनच त्याने विकृतीचा कळस गाठत पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावल्याचा प्रकार घडलाय. पीडित महिलेवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाकड पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडितेचा जबाब नोंदवला.
पुण्यातील कोथरुड परिसरात रात्री बाराच्या सुमारास कोयता गॅंगचा थरार पाहायला मिळाला. रस्त्यावरुन जात असलेल्या दुचाकीला अडवून 22 वर्षीय मुलावर सपासप वार कत दहशत निर्माण केली आणि पसार झाले. त्यानंतर आजूबाजूच्यांनी हा प्रकार पाहताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला दवाखान्यात दाखल केलं असता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वर्चस्वाच्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
त्यानंतर बलात्काराच्या घटनेनंदेखील पुणं हादरलं आहे. दोन अल्पवयीन तरुणींना ड्रग्जसोबत दारु पाजून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. पुण्यातील राजगुरुनगर परिसरात शुक्रवारी (17) ही घटना घडली आहे. अत्याचार करण्यात आलेल्या दोन्ही मुली अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. राजगुरुनगर शहरात भयानक आणि किळसवाणी घटना घडल्याने संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. या प्रकरणी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या आणि अत्याचार करणा-या दोघांवर राजगुरुनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या तिन्ही घटनांमुळे पुण्यात चांगलंच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुमं शहर गुन्हेगारीच्या विळख्यात सापडलं असल्याचं या घटनांमधून समोर आलं आहे. मात्र या घटनांना आणि गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी पुणे पोलीस कार्यरत आहे. मात्र त्यांना यश येताना दिसत नाही आहे.
इतर महत्वाची बातमी-
Fodder Shortage: राज्यात पाणीबाणीनंतर आता चारा टंचाईचे संकट; फक्त दोन महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता