एक्स्प्लोर

Fodder Shortage: राज्यात पाणीबाणीनंतर आता चारा टंचाईचे संकट; फक्त दोन महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध

आज राज्यभरात दोन महिने पुरेल इतका चारा उपलब्ध. जर चारा डेपो सुरु करावे लागले तर चारा उपलब्ध करून देण्याची शासनाची तयारी आहे, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

Maharashtra News : नाशिक : राज्यात सध्या पाणीटंचाईचं (Water Shortage Issue) भीषण संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत चारा टंचाई (Fodder Shortage) निर्माण होईल, अशी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यात (Maharashtra News) सध्या 2 महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध असून चारा डेपो सुरू करण्याची शासनाची तयारी असल्याचं दुग्ध आणि पशु संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Dairy and Animal Husbandry Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितलं आहे. 

दुग्ध आणि पशु संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) बोलताना म्हणाले की, "येणाऱ्या काळात चाऱ्याची टंचाई निर्माण होईल हा विचार करूनच आपण ऍडव्हान्स प्लॅनिंग केलं आहे. आज राज्यभरात दोन महिने पुरेल इतका चारा उपलब्ध. जर चारा डेपो सुरु करावे लागले तर चारा उपलब्ध करून देण्याची शासनाची तयारी आहे. चारा उत्पादनासाठी आपण शेतकऱ्यांना चांगला भाव देतो. त्यामुळे यंदा उत्पन्न चांगलं. जिथे पाण्याची उपलब्धता चांगली आहे. तिथल्या शेतकऱ्यांना आपण बियाणे मोफत देतो, चारा उत्पादन करण्यासाठी चारा छावाण्या सुरु करण्याची सध्या गरज नाही. तसेच, चारा आयात करण्याचीही गरज नाही, असं मत दुग्ध आणि पशु संवर्धन मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. पाऊस कमी झाला की, धरणं कमी भरतात. त्यामुळे आता पश्चिम वहिनी नद्याचं पाणी गोदावरी खोऱ्यात आणायची योजना आपण हाती घेतली आहे, अशीही माहीती विखे पाटील यांनी दिली आहे.  

नगरमध्ये 5 दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी

नगर जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई असून नागरिकांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात पाच-सहा दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या टँकर्सवर अवलंबून राहावे लागत आहे. नगरमध्ये सर्वाधिक 99 पिण्याचे टँकर हे पाथर्डी तालुक्यात सुरु करण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील 291 गावांत आणि 1544 वाड्या वास्त्यावरील 5 लाख 70 हजार लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ : Radhakrishna Vikhe Patil : राज्यात दोन महिने पुरेल एवढा चारा, छावण्या सुरू करण्याची गरज नाही

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ahmednagar News: मोठी बातमी: नगर जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती, जनावरांना दीड महिना पुरेल एवढाच चारा शिल्लक, शेतकरी टेन्शनमध्ये

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar meet Shard Pawar : प्रफुल पटेलांनी 10 दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेटSanjay Raut On Ajit Pawar : शरद पवारांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुणालाच एक पाऊल पुढे टाकता येत नाहीAjit Pawar meet Sharad Pawar : भेटीत काय चर्चा झाली ? अजित पवारांनी सगळंच सांगितलंSharad Pawar Birthday :शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते नवी दिल्लीतील निवासस्थानी उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Video : भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
नितीश राणा-आयुष बदोनी यांच्यात भरमैदानात वाद, अम्पायरची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
Sushma Andhare: परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Sharad Pawar & Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली, भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न?
शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांनी एकदा दगडात अनेक पक्षी मारले , नेमका कोणता पॉलिटिकल मेसेज दिला?
Sharad Pawar : आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
Embed widget