एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पुण्यात चाललंय तरी काय? खंडणीसाठी अपहरण करून मित्रांनी केली मैत्रिणीची हत्या अन् मृतदेह पुरला शेतात

Pune Crime News:  पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून (Pune Crime News) टाकला. खून केल्यानंतर आरोपींनी तरुणीच्या मोबाईलवरून तिच्या कुटुंबीयाकडे खंडणी देखील मागितली.

पुणे:  लातूर येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका 22 वर्षेीय तरुणीचं अपहरण करुण तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी  हत्या (Pune Murder)  केल्याचं समोर आलं आहे. कर्जबाजारीपणातून आरोपींनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी अधिकचा तपास सुरु आहे.  पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून (Pune Crime News) टाकला. खून केल्यानंतर आरोपींनी तरुणीच्या मोबाईलवरून तिच्या कुटुंबीयाकडे खंडणी देखील मागितली. पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा उलगडा केला असून तीन आरोपींना अटक केली आहे. 

भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय 22) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी शिवम फुलावळे, सागर जाधव आणि सुरेश इंदोरे या तिघांना अटक केली आहे. मयत तरुणीचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे (वय 49) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. 

नऊ लाख रुपये द्या अन्यथा मुलीला ...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळची लातूरची असलेली भाग्यश्री वाघोली परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होती. 30  मार्चच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास ती बेपत्ता विमानतळ परिसरातील फिनिक्स मॉल येथून बेपत्ता झाली होती. दरम्यान मुलींसोबत संपर्क होत नसल्याने तिच्या आई-वडिलांनी पुणे गाठून पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. याच कालावधीत तिच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर खंडणीसाठी मेसेजही आला. नऊ लाख रुपये द्या अन्यथा मुलीला मारून टाकू अशी धमकी त्यामध्ये देण्यात आली होती. 

सुप्यातील एका शेतात मृतदेह पुरला

पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. तीनही आरोपी मयत तरुणीचे मित्र आहे.30 मार्चच्या रात्री आरोपींनी भाग्यश्रीचे अपहरण केले आणि खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून टाकला. 

भाग्यश्रीचे अपहरण केल्यास आपल्याला पैसे मिळू शकतात असा आरोपींचा समज

प्राथमिक माहितीनुसार आर्थिक कर्जबाजारीपणातून आरोपींनी हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  भाग्यश्रीचे अपहरण केल्यास आपल्याला पैसे मिळू शकतात असा आरोपींचा समज झाला. आणि त्यातूनच त्यांनी ही कृत्य केले. तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुणे पोलीस अधिक तपास करत आहे.

हे ही वाचा :

अनैसर्गिक संबंधासाठी आधी अपहरण, नंतर हात-पाय बांधून पाण्यात टाकलं; अल्पवयीन मुलाच्या खुनामुळे ठाण्यात खळबळ!

                        

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaCM Eknath shinde Special Report : फडणवीसांप्रमाणे शिंदे सहज मुख्यमंत्रीपद सोडतील ?Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Embed widget