Pune Crime News : धक्कादायक! पुण्यात दुहेरी हत्याकांड, रक्ताने माखलेला टिकाव घेऊन आरोपी रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Pune Crime News : पुण्याच्या (Pune) दापोडीत दुहेरी हत्याकांडाने (Double Murder Case) एकच खळबळ उडाली आहे.
![Pune Crime News : धक्कादायक! पुण्यात दुहेरी हत्याकांड, रक्ताने माखलेला टिकाव घेऊन आरोपी रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात Pune Crime News Double Murder Case police arrested accused in Bhosari Police Pune Crime News : धक्कादायक! पुण्यात दुहेरी हत्याकांड, रक्ताने माखलेला टिकाव घेऊन आरोपी रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/54862097b06f49cd474e827ef0f197db1675764564998125_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Crime News : पुण्याच्या (Pune) दापोडीत दुहेरी हत्याकांडाने (Double Murder Case) एकच खळबळ उडाली आहे. आरोपी रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरत होता. या प्रकरणी आरोपीला भोसरी पोलिसांनी (Bhosari Police) ताब्यात घेतले आहे. शंकर नारायण काटे (वय- 60) आणि संगीता काटे (वय- 55) अशी हत्या झालेल्या पती-पत्नींची नावे आहेत. प्रमोद मगरुडकर (वय- 47) असे आरोपीचे नाव असून त्याला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात
दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं आहे. अद्याप या दुहेरी हत्येचे कारण समजू शकेलेले नाही. दापोडीत बेसावध असलेल्या दाम्पत्यावर टीकावाने घाव घालून दुहेरी हत्या करण्यात आली आहे. काटे दाम्पत्य हे त्यांच्या घरात बसले होते. तेव्हा, आरोपी प्रमोद त्यांच्यावर टिकावाचे घाव घातले. ही घटना शनिवारच्या रात्री दहा वाजता समोर आली आहे. आरोपी प्रमोद हा हत्या करून रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर दिसला. हे पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ येऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रमोद हा नुकताच दिल्लीवरून आलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
नगरला एका महिन्यात दुसरं दुहेरी हत्याकांड, जामखेड बंदची हाक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)