(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wanwadi Pune Crime News : भरदिवसा मास्क लावून आले, हाणामारी केली अन् सोन्याचं दुकान लुटलं!
पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. वानवडी हद्दीतील वाडकर मळ्याशेजारी हे ज्वेलर्स आहे.
पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून पुण्यात चोरीच्या घटना (Pune Crime News) समोर आल्या आहेत. अनेकदा चोरीच्या घटना समोर आल्याने अनेक परिसरात दहशतीचं वातावरणदेखील पाहायला मिळालं होतं. मात्र आता पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. वानवडी हद्दीतील वाडकर मळ्याशेजारी हे ज्वेलर्स आहे. या ठिकाणी हा दरोडा टाकण्यात आला आहे. सात जण मिळून हा दरोडा टाकला आहे. भरदिवसा टाकण्यात आलेल्या दरोड्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
साधारण दुपारी 12 च्या सुमारास दरोडेखोर मास्क लावून आले आणि त्यांनी दुकानदाराला धाक दाखवायला सुरुवात केली. शस्त्राचा धाक दाखवला आणि थेट दरोडा टाकला. मास्क लावून आले आणि त्यांनी दुकानातील तब्बल 300 ते 350 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. चोरांनी सगळे दागिने लंपास केले आणि थेट दुचाकीवरुन फरार झाले. ही घटना कळताच पोलीस ज्वेलर्समध्ये दाखल झाले आहेत आणि सर्व तपास करत आहेत. या सगळ्या घटनेचा पंचनामा पोलीस करत आहेत. सीसीटीव्हीदेखील पोलीस तपासत आहे.
दुकानातील सिसिटीव्ही देखील तपासण्यात येत आहे. सीसीटीव्हीत दोन दरोडे खोरांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकान लुटले आहे. घटनास्थळी डीसीपी आर राजा, सपोआ इंगळे यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकारीदेखील पोहोचले आहेत. या दुकानातून साधारण 7 अनोळखी इसमांनी मास्क लावून बीजेएफ ज्वेलर्समधून 300 ते 400 ग्राम सोन्या चांदीचे दागिने लुटले आहे.
चोरीच्या घटनेत वाढ
काहीच दिवसांपूर्वी पुण्यात एका सराफ्याच्या दुकानात दुकानदाराची नजर चोरून जबरी चोरी करण्यात आली होती. येरवडा भागात असलेल्या सराफा दुकानात 6 जणांनी चोरी केली होती महत्वाचं म्हणजे दुकानदाराचे लक्ष विचलित करून चोरी केली होती. महावीर ज्वेलर्स असे येरवडा भागात असलेल्या सराफ दुकानाचं नाव होतं. या दुकानातून चोरट्यांनी लंपास 372 ग्रॅमचे दागिने लंपास केले होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुण्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत चांगलीच वाढ झाली आहे. त्यात घरावर दरोडा, रस्त्यांवरील गाड्या चोरण्याची प्रकरणं जास्त आहे. त्यात सराफा दुकानातदेखील भरदिवसा चोरी झाल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत. यातच आता सोन्याच्या दुकानात नजर चुकवून चोरी करायची घटना समोर आल्याने दुकानदारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
इतर महत्वाची बातमी-
Fodder Shortage: राज्यात पाणीबाणीनंतर आता चारा टंचाईचे संकट; फक्त दोन महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता