एक्स्प्लोर
पुण्यात जेसीबीवर चढलेल्या चिमुरड्याची चालकाकडून क्रूर चेष्टा
पुण्यात जेसीबीच्या बकेटवर चढलेल्या एका चिमुरड्याला ड्रायव्हरने गमतीपोटी घाबरवल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे : तुमची मुलं बाहेर एकटी खेळायला जातात, तेव्हा त्यांच्यावर नजर ठेवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पुण्यात जेसीबीच्या बकेटवर चढलेल्या एका चिमुरड्याला ड्रायव्हरने गमतीपोटी घाबरवल्याचा प्रकार समोर आला आहे.
खेळत असताना बॉल पोकलेनच्या बकेटमध्ये अडकल्यामुळे तो काढण्यासाठी सार्थक लिंबोणे बकेटवर चढला. ही गोष्ट जेसीबी चालकाच्या लक्षात आली. त्यामुळे सार्थकला घाबरवण्यासाठी ड्रायव्हरने जेसीबी सुरु केली.
हा प्रकार कॅमेरात कैद झाला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो पाहून कुणी हसलं, तर कुणी जेसीबीवाल्याला लाखोल्या वाहिल्या. याच व्हिडिओमध्ये गयावया करणाऱ्या पोराला 'एबीपी माझा'ने शोधलं.
पुण्याच्या गणेश पेठेतल्या नागझरी नाला परिसरात राहणारा सार्थक लिंबोणे... गल्ली बोळात खेळण्यासाठी जागा नाही. त्यामुळे सार्थक आणि त्याचे मित्र नाल्याशेजारच्या रिकाम्या जागी खेळायला आले.
बॉल नाल्याच्या पलिकडे गेला आणि तो काढण्यासाठी सार्थक जेसीबीच्या बकेटमध्ये बसला. सार्थकच्याच मित्रांनी काढलेला व्हिडिओ व्हायरल होत होत त्याच्याच वडिलांकडे पोहचला आणि मग आपल्या पोरावर केलेला अकारण धाडसी स्टंट समोर आला.
या नागझरी नाल्यातला कचरा काढण्याचं कंत्राट मनपानं कंत्राटदारांना दिलं आहे. त्याच कंत्राटदाराचा हा जेसीबी असण्याची शक्यता आहे.
खरं तर जेसीबीच्या खोऱ्यात बसलेलं ते पोर घाबरलं होतं, पण उतरल्यानंतर त्याला गंमतही वाटली. त्या जेसीबीवाल्यानेही सार्थकची मस्करी करण्याच्या उद्देशानेच हा प्रताप केला असेल, यात शंका नाही. पण मस्करीची कुस्करी झाली असती, तर कितीला पडलं असतं?
पाहा व्हिडिओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
Advertisement