एक्स्प्लोर
पुण्यात ITI च्या 138 विद्यार्थ्यांना तांत्रिक चुकीमुळे शून्य गुण

पुणे : पुण्याच्या औँधमधील आयटीआयच्या 138 विद्यार्थ्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. या 138 विद्यार्थ्यांना शून्य मार्क्स मिळाल्याचं गुणपत्रिकेत दिसत आहे. दोन महिन्यांपूर्वी या विद्यार्थ्यांना त्यांच्या दुसऱ्या सत्राचे निकाल मिळाले. यात शून्य मार्क्स मिळाल्यानं अधिक चौकशी केली असता ही तांत्रिक चूक असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. तसेच या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायला लावली. मात्र अजूनही फेरपरीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांच्या हाती सुधारित निकाल आलेला नाही. औँधच्या आयटीआयमध्ये 2600 विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. यापैकी काही विद्यार्थ्यांना तिन्ही सेमिस्टरमध्ये शून्य मार्क्स मिळाले आहेत. त्यामुळे चौथ्या सेमिस्टरची परीक्षा द्यायची कशी हा प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहे. विशेष म्हणजे केवळ औंधमधल्या आयटीआयमध्येच नाही तर राज्यातल्या इतर आयटीआयमध्येही ही परिस्थिती निर्माण झाल्याचं समजतं.
आणखी वाचा























