एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Accident News: पुण्यात भीषण अपघात! भरधाव कंटेनरने रिक्षाला उडवलं अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी
Pune Accident News: रिक्षाला भरधाव कंटेनरने उडवलं त्यानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे. या भीषण अपघाताच्या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
पुणे: पुण्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रिक्षाला भरधाव कंटेनरने उडवलं त्यानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे. या भीषण अपघाताच्या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे सोलापूर रोडवरील सिद्धिविनायक पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली आहे. (Pune Accident News)
या भीषण घटनेनंतर पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारांसाठी तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, तर या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी आहेत.(Pune Accident News)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement