(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Accident : पुण्यात भरधाव वेगाचे दोन बळी; पब फक्त नावालाच बंद, रात्रीचा धिंगाणा सुरुच, आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली!
पुण्यात कल्याणी नगर परिसरात एका आलिशान सुपरकारने रात्री अडीच वाजताच्या सुमारात दोघांना उडवलं. यात दोघांचा मृत्यू झाला. पबमधून पार्टी करुन परत येत असताना हा अपघात झाला.
पुणे : पुण्यात कल्याणी नगर परिसरात एका (Pune Accident News) आलिशान सुपरकारने रात्री अडीच वाजताच्या सुमारात दोघांना उडवलं. यात दोघांचा मृत्यू झाला. पबमधून पार्टी करुन परत येत असताना हा अपघात झाला. पोलीस आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता रात्री उशिरापर्यंत पब सुरु असल्यानं असे अपघात घडत असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.
पुण्यातील रात्रीचा राडा आणि गुन्हेगारी थांबवण्यासाठी पुणे पोलिसांनी अनेक कठोर निर्णय घेतले. त्यात पुण्यातील पब (Pubs), बार (Bar), रेस्टोरंट आणि हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवागी आहे.मात्र सगळीकडे पब चालू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यात अनेक बार आणि पबमध्ये रात्रीचा धिंगाणा सुरु असल्याचंदेखील दिसत आहे. त्यामुळे रात्री अशा प्रकारचे प्रकार घडताना दिसत आहे. या तरुणांना पोलिसांचा धाक नाही की पोलिसांचं या सगळ्याकडे लक्ष नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.
रात्री बराच वेळ पुण्यातील पब सुरु राहतात त्यामुळे मद्यप्रशान केलेले तरुण तरुणी रात्री उशीरा पबमधून बाहेर पडतात. त्यानंतर रस्त्यावर मद्यप्राशन करु गाड्या चालवतात. रात्रीच्या वेळी पुण्यातील रस्त्यांवर या सगळ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. साधारण दोन तीनच्या सुमारास भरधाव आलिशान गाड्या पुण्यातील रस्त्यांवर दिसतात. त्यामुळे पुणे पोलिसांचे नियमांचं पालन न करता हा सगळा प्रकार सुरु असतात आणि त्यामुळे जीव जातात.
पुण्यात कोणत्याही प्रकारच्या हुक्क्याला पुण्यात बंदी आहे. रूफ टॉप हॉटेलमधील साउंड सिस्टीम रात्री दहा वाजता बंद करावी लागतात. परवाना नसलेल्या हॉटेलमध्ये दारू पिताना आढळल्यास दारू पिणार्यावर आणि हॉटेल मालक अशा दोघांवर कारवाई करण्यात येणार असं सांगण्यात आलं होतं. पोलिसांनी गरज असेल तरच बार आणि पबच्या आतमध्ये प्रवेश करावा अन्यथा व्यवसायायात अडथळे आणू नयेत अशा सूचना देण्यात आल्या होत्या. एवढं असूनही पुण्यात असे प्रकार आणि गुन्हेगारी काही कमी व्हायचं नाव घेत नाही आहे.
भरधाव वेगाचे दोन बळी
या बार आणि पबवरुन परतताना अनेक तरुण मद्यप्राशन करुन गाड्या चालवतात आणि या गाड्यांचा अति वेग असतो. हाच वेग आता तरुणांच्याच जीवावर बेतताना दिसत आहे. पोर्शे चालकाच्या वेगानं दोघांचा बळी गेलाय. येत्या काळात असंच सुरु राहिलं तर अनेकांच्या जीव धोक्यात असणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
पुण्यात भरधाव सुपरकारने पार्टी करुन परत येणाऱ्या दोघांना चिरडलं; मध्यरात्रीच्या घटनेनं थरकाप