Pune Accident : पोर्शे कारची घटना ताजी असतानात पुण्यात पुन्हा एक विचित्र अपघात; भरधाव ट्रकने दोघांना चिरडलं!
पुण्यात रॅश ड्रायव्हिंग आणि हीट अॅड रनची प्रकरणं काही संपायचं नाव घेत नाही. या अपघातांचं सत्र सुरुच आहे. पुण्यातील पोर्शे कारचा अपघात ताजा असतानात एका ट्रकने दुचाकीस्वाराला जोरात धडक दिली आहे
पुणे : पुण्यात रॅश ड्रायव्हिंग आणि हीट अॅड रनची प्रकरणं काही (Pune Accident News) संपायचं नाव घेत नाही. या अपघातांचं सत्र सुरुच आहे. पुण्यातील पोर्शे कारचा अपघात ताजा असतानात एका ट्रकने दुचाकीस्वाराला जोरात धडक दिली आहे. या विचित्र अपघातात 2 दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील खराडी या ठिकाणी काल रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पुण्यातील खराडी परिसरात मोठी रहदारी असते. मोठ मोठ्या वाहनांची रेलचेल असते. त्यातच हे सगळे ट्रक चालक रात्रीचा मोकळा रस्ता पाहून भरधाव वेगाने ट्रक चालक ट्रक चालवतात. याच भरधाव वेगाने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. त्यातच काल रात्री झालेल्या विचित्र अपघातात पुन्हा दोन दुचाकीस्वारांचा नाहक बळी गेला आहे. त्यामुेळ ट्रक चालकांवर मोठा संताप व्यक्त केला जा आहे.
एकच आठवड्यापूर्वी याच रस्त्यावर असलेल्या कल्याणी नगरमध्ये मध्यरात्री मोठा अपघात झाला होता. पोर्शे कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली होती. यात दोन इंजिनिअर असलेल्या तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर या अपघातामुळे मोठा वादंग निर्माण झाला. बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत दोघांना चिरडलं होतं. त्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला. अल्पवयीन मुलाला 15 तासात जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर संतापाची लाट उसळली होती. मात्र त्याला पुन्हा एकदा कोर्टात हजर केल्यानंतर बाल सुधार गृहात त्याची रवानगी करण्यात आली. त्यानंतर त्यांचे वडिल, आजोबांना अटक करण्यात आली. सोबतच या प्रकरणात पोलीस आणि डॉक्टरांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. ़
पुण्यात मागील काही दिवसांपासून अनेक अपघात होत आहे. रात्रीच्यावेळी होणाऱ्या अपघाताचं प्रमाण जास्त आहे आणि याच दरम्यान झालेल्या अपघातात अनेकांचा जीवदेखील गेला आहे. पुण्यातील पब रात्रीच्यावेळी उशिरापर्यंत सुरु असतात. त्यामुळे अनेक तरुण उशिरा मद्यप्रशान करुन बाहेर पडतात. या मद्यप्राशनामुळे अपघात होतात. शिवाय यावेळी ट्रकची वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणात सुरु असते. त्यात असे तरुण ट्रकला आडवे आले की भरधाव ट्रक त्यांना चिरडतात परिणामी जागीच मृत्यू होतात. हे अपघात थांबवण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहे.
इतर महत्वाची बातमी-