एक्स्प्लोर
Advertisement

(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चॉकलेटचे पैसे मागितल्याने पुण्यात 9 पैलवानांची कर्मचाऱ्यांना मारहाण
नऊ पैलवानांना पोलिसांनी अटक केली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे.

प्रातिनिधीक फोटो
पुणे : चॉकलेटचे पैसे मागितल्याच्या रागातून नऊ पैलवानांनी सुपरमार्केटमध्ये हंगामा केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यात डी-मार्ट स्टोअरमध्ये सामानाची तोडफोड करुन पैलवानांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी नऊ पैलवानांना पोलिसांनी अटक केली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे.
पुण्यातील कात्रज बाह्यवळण मार्गावर असhणाऱ्या डी-मार्टमध्ये नऊ पैलवान गेले होते. त्यावेळी चॉकलेट घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पैलवानांकडे त्याचे पैसे मागितले. मात्र याचा राग आल्यामुळे नऊ पैलवानांनी दुकानाची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना मारहाण केली.
ही घटना रविवारी म्हणजे 14 जानेवारीला रात्री साडेनऊ वाजता घडली. या प्रकरणी डी-मार्टचे व्यवस्थापक बाबासाहेब पाटील यांनी भारती विद्यापीठ पोलिसात फिर्याद दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
