Pooja Khedkar Car : लाल दिवा लावलेल्या ऑडीने 21 वेळा वाहतूक नियम मोडले, अखेर खेडकर कुटुंबियांनी 27 हजार 400 रुपयांचा दंड भरला
Pooja Khedkar Car : आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) जी लाल दिवा लावलेली ऑडी कार वापरली, त्या कारने तब्बल 21 वेळा वाहतूक निय मोडल्याची माहिती समोर आली आहे.
Pooja Khedkar Car : आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) जी लाल दिवा लावलेली ऑडी कार वापरली, त्या कारने तब्बल 21 वेळा वाहतूक निय मोडल्याची माहिती समोर आली आहे. वाहतूक नियम मोडल्यामुळे पोलिसांनी त्या कार मालकाला 27 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावला होता. अखेर खेडकर कुटुंबियांनी 27 हजार 400 रुपयांचा दंड भरलाय. अंबर दिवा लावलेली ती ऑडी गाडी खेडकर (Pooja Khedkar) कुटुंबिय डायरेक्टर असलेल्या कंपनीच्या नावे आहे. IAS पुजा खेडकर तीच ऑडी कार वापरत होत्या.
गाडी कोणाच्या नावावर?
आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) वापरत होत्या ती ऑडी कार थर्मोव्हेरिटा इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. या गाडीचे मूळ मालक नोरमा खेडकर यांच्यासोबत एका कंपनीमध्ये संचालक म्हणून काम करत होते. मनोरमा खेडकर या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आहेत. डिलिजन्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नाव आहे. ही कंपनी मनोरमा खेडकर यांच्या नावावर आहे.
खेडकर कुटुंबियांचे कारनामे सुरुच , जमीन हडपण्यासाठी पिस्तुल काढलं
पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या नावे पुणे (Pune) जिल्ह्यातील मुळशी (Mulashi) तालुक्यातील धडवली गावात स्थानिक शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करण्यात आली. मात्र जेवढी जमीन खरेदी करण्यात आली त्यापेक्षा जास्त जमिनीवर खेडकर कुटुंबाने दावा करायला सुरुवात केली. मात्र शेतकऱ्यांनी याला विरोध केला, तेव्हा पुजा खेडकर (Pooja Khedkar) यांची आई मनोरमा खेडकर यांनी चक्क पिस्तूल काढून या शेतकऱ्यांना धमकावलं होत. आता ही जमीन खेडकर कुटुंबीयांच्या सामाईक मालकीची असून अजून या जमीनीच्या वाटण्या झालेल्या नाहीत, असा पासलकर कुटुंबीयांचा दावा आहे.
मात्र खेडकर कुटुंबाने मन मानेल त्या ठिकाणी जमीनीवर दावा करायला सुरुवात केली. त्याला विरोध करणाऱ्या मरगळे आणि पासलकर या शेतकरी कुटुंबांनी जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा पेटवून देण्यात आला तर कधी त्यांच्या शेळ्यांवर कुत्री सोडण्यात आली. मुळशी भागातील जमीनी हडप करण्यासाठी लॅन्ड माफियांनी मांडलेला उच्छाद मुळशी पॅटर्न सीनेमात प्रेक्षकांनी पाहिलाय. मात्र इथं ज्यांच्यावर कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे ते खेडकर कुटुंबच हा पॅटर्न राबविताना दिसतंय.
इतर महत्वाच्या बातम्या
IAS Officer Pooja Khedkar's Family : खेडकर कुटुंबियांची मग्रुरी, जमीन हडपण्यासाठी शेतकऱ्यांचा चारा पेटवून दिला, शेळ्यांवर कुत्री सोडली; पोलिसही दखल घेईनात