एक्स्प्लोर
पुण्यात तिकिट वाटपावरुन भाजप नेत्यांमध्ये हमरीतुमरी
पुणे : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काल पुणे भाजप कार्यकारिणीची बैठक झाली, मात्र या बैठकीत आपल्या समर्थकांना तिकीट मिळावं म्हणून भाजप नेते हमरीतुमरीवर उतरले. मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत यावर तोडगा काढणार असल्याचं सांगितलं आहे.
पुण्यात पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील अंतर्गत गटबाजीला ऊत आला आहे. शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर भाजप नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या तिकीटासाठी फिल्डिंग लावली आहे. काल पुण्यात तिकिटवाटपासंबंधी भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला खा. अनिल शिरोळे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, गिरीश बापट, संजय काकडे आदी नेते हजर होते. मात्र तिकिटवाटपावरुन या नेत्यांमध्ये वादावादी झाली. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी मध्यस्थी करत तोडगा काढणार असल्याचं सांगितलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थीसाठी पुढाकार घेतल्यावर भाजप नेत्यांनी मुंबईची वाट धरली आहे. पुण्यातील शिवाजीनगर, कँटॉनमेंट आणि वडगाव शेरी या तीन ठिकाणच्या तिकिटवाटपावर या बैठकीवेळी एकमत झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement