एक्स्प्लोर
तरुणाला वाचवण्यासाठी पोलिसाची थेट नदीत उडी
आपण एका मुलाचा जीव वाचवल्याने आनंद होत आहे अशी भावना पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे : पुना हॉस्पिटलसमोरील पुलावरून एका युवकाने आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुठा नदीत उडी मारली. तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या रवींद्र साबळे या पोलिस कर्मचाऱ्यानेही त्याला वाचविण्यासाठी उडी मारली आणि भिडे पुलाजवळून त्याला बाहेर काढले.
पुना हॉस्पिटलसमोरील पुलावरून वडील सांगत आले की, मुलाने पाण्यात उडी मारली आहे. तेव्हा वडिलांनी आरडाओरडा केल्याने तेथे असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानेही त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. भिडे पुलाजवळ त्याला बाहेर काढण्यात यश आले.
मुलाचं त्याच्या वडिलांशी भांडण झाले असावे आणि त्यातून त्या मुलाने उडी मारल्याचा संशय व्यक्त केला आहे. मुलाला ससून हॉस्पिटल भरती केलं असून त्याची तब्येत चांगली आहे.
दरम्यान, आपण एका मुलाचा जीव वाचवल्याने आनंद होत आहे अशी भावना पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement