एक्स्प्लोर
पुण्यात 'पीएमपीएमएल'चे 440 कंत्राटी बसचालक संपावर
पुणे : पुण्यात पीएमपीएमएलच्या भाडेतत्वावरील 440 बसचालकांनी आज अचानक संप पुकारला. दुपारी दोनपासून कंत्राटी बसचालक अचानक संपावर गेल्यानं पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील बससेवा विस्कळीत झाली. पीएमपीएलकडून करण्यात येणाऱ्या कारवाईविरोधात चालकांनी संप पुकारला आहे.
तुकाराम मुंढेंनी 'पीएमपी'ची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतल्यानंतर अनेक धाडसी निर्णय घेतले. यात एखाद्या स्टॉपवर गाडी न थांबल्यास चालकावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही करण्यात आली. जर चालकाकडून एखादी चूक झाली किंवा त्याने सिग्नल तोडला तर त्याच्या पगारातून 100 रुपये दंड म्हणून घेतले जातात.
तुकाराम मुंढेंचा हा निर्णय जाचक असल्याचं सांगत पीएमपीच्या कंत्राटी चालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. पीएमपीएमएलची जीपीएस यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत नसल्याने चुकीची माहिती मिळते असं चालकांचं म्हणणं आहे. हा निर्णय मागे घेण्याची चालकांनी मागणी केली आहे. दरम्यान याप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement