Pm Narendra Modi : तारीख ठरली! मुरलीधर मोहोळांसाठी पुण्यात 'या' दिवशी पंतप्रधान मोदींची सभा
पुण्यात 29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. मुरलीधर मोहोळांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
पुणे : सध्या सगळीकडेच लोकसभेच्या निवडणुकीचे वारे सुरु आहे. त्यात सगळ्या पक्षाकडून मोठ मोठ्या सभा आणि रोड शो घेतले जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रत्येक नेत्यांकडून मतदार संघात शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील प्रचारसभा घेताना दिसत आहे. विदर्भातील सभेनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात सभा घेणार आहे. पुण्यात 29 एप्रिलला पंतप्रधानांची सभा होणार आहे.
पुण्याच्या एसपी कॉलेज ग्राऊंडवर ही भव्य सभा होणार असल्याची माहिती आहे. या सभेतून मोदी मुरलधीर मोहोळांचा प्रचार करणार आहेत. कोणत्याही प्रकारचा रोड शो वगरे होणार नसून मोठी सभा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या सभेत मोदी पुणेकरांना काय आवाहन करतील, हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे.
पुणे लोकसभेसाठी महायुतीकडून मुरलीधर मोहोळांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी मुरलीधर मोहोळ एकहाती निवडणूक गाजवणार अशी चर्चा होती . मात्र त्यानंतर महाविकास आघाडीने आपला मोहरा बाहेर काढला अन् भाजपच्या 40 वर्षांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कसबा काबीज केलेल्या रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर भाजपचं काही प्रमाणात टेन्शन वाढलं. शुअर असलेल्या जागेसाठी धंगेकरांमुळे आता भाजपला प्रचंड कस लावावा लागत आहे. त्यामुळे शक्तीप्रदर्शन आणि महयुतीच्या मोठ्या नेत्यांत्या सभेसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. मोदी पुणेकरांना मतदानाचं आवाहन करणार आहेत.
पुण्यात तिरंगी लढत
पुण्यात लोकसभेची तिरंगी लढत होणार आहे. महाविकास आघाडीकडून रवी्ंद्र धंगेकर, महायुतीकडून मुरलीधर मोहोळ आणि वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे तिन्ही उमेदवार पुण्यात तगडे मानले जात आहे. त्यामुळे तिन्ही उमेदवार चांगलेच प्रचाराला भिडले आहेत. भाजपचे अनेक राज्यस्थरावरील नेत्यांचं पुण्याकडे बारीक लक्ष ठेवत आहे. त्यासोबतच रोज नवी रणनिती आखली जात आहे.
कॉंग्रेसचे उमेदवार रवींंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठीदेखील राहुल गांधी, प्रियांका गांधी सभा घेणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबतच अदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे राज्यातील नेतेदेखील येणार असल्याची माहिती आहे. त्याच्यासोबतत वसंत मोरेंसाठी वंचितचे नेते येणार आहेत.
इतर महत्वाची बातमी-
Pm Narendra Modi : तारीख ठरली! मुरलीधर मोहोळांसाठी पुण्यात 'या' दिवशी पंतप्रधान मोदींची सभा