Rajesh Patil Transfer : पिंपरी पालिका आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीये. आता शेखर सिंह शहराची सूत्र हाती घेणार आहेत.
Rajesh Patil Transfer : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीये. आता शेखर सिंह शहराची सूत्र हाती घेणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मर्जीतले राजेश पाटील भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत नव्हते. तसेच शहरातील रस्त्यालगतचं अतिक्रमण हटवले, त्यावेळी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आयुक्तांकडे कारवाई थांबविण्यासाठी आग्रह करत होते. मात्र त्यांनी एका ही लोकप्रतिनिधीला जुमानले नव्हते. अखेर सत्तांतर झालं अन त्यांची उचलबांगडी करण्यात आली.
फेब्रुवारी 2021 मध्ये राजेश पाटील महापालिका आयुक्त म्हणून रूजू झाले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील त्यांनी शहराची जबाबदारी घेत चांगली कामगिरी पार पाडली होती. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले होते. मात्र 18 महिन्यातच त्यांची उचलबांगडी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरात येण्याआधी ते ओडीसा राज्यात कार्यरत होते. पिंपरी-चिंचवडमध्ये आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी केलेल्या कार्यात वाद निर्माण करण्यात आला होता. अनेकांशी त्यांचे खडके उडल असल्याचं देखील समोर आलं होतं. कार्यतत्पर असणारे आयुक्त म्हणून त्यांनी ओळख झाली होती.
सुरक्षा तृतीयपंथीयांच्या हाती देत घेतला होता महत्वाचा निर्णय
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने तृतीयपंथीना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यानी विशेष प्रयत्न केला होता. त्या दिशेने पाऊल टाकत तृतीपंथीयांची सुरक्षा रक्षक म्हणून निवड केली होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) तृतीय लिंग व्यक्तींना सुरक्षा रक्षक म्हणून स्वीकारले होतं. त्यांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्यात आले आहे. शहरात पाच हजारांपेक्षा अधिक तृतीपंथी आहेत. बहुतांश तृतीयपंथ्यांकडे नागरिक वेगळ्यान नजरेने पाहतात. दुसरीकडे त्यांना सन्माने जगता, वावरत यावं म्हणून महानगरपालिकेने तृतीयपंथीसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुकही झालं होतं.
अनेक क्षेत्रात त्यांच्यासाठी कशा पद्धतीने कार्य करता येईल याचं नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. वकील, डॉक्टर आणि खान्देशात तर नगरसेवक म्हणूनसुद्धा तृतीयपंथीयांना निवडून दिलं जात आहे. मात्र काही भागात अजूनही त्यांची अवहेलना केली जाते. त्यांना निच वागणूक दिली जाते. त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क प्रत्येक विभागाने द्यायला हवा. पिंपरी-चिंचवड महापालिकेने आज त्यांना रुजू करुन घेत समाजापुढे नवा आदर्श ठेवला होता.