Pune Politics: '...म्हणून पिंपरी चिंचवडला मंत्री पद हवंचं'; शहर भाजपने मांडला लेखाजोखा, मंत्रीपदासाठी पदाधिकाऱ्यांची आग्रही भूमिका
Pune Politics: पिंपरी चिंचवड शहराला मंत्रीपद मिळावं यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट विधानसभेचा लेखाजोखा मांडला आहे. त्याचबरोबर आजवर शहराला न मिळालेलं मंत्रीपद यंदा मिळायला हवंचं अशी आग्रही भूमिका शहर भाजपने घेतली आहे.
पुणे: राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी नंतर आता मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागावी यासाठी लॉबिंग सुरु झाल्याचं चित्र राज्यभरात दिसून येत आहे. यासाठी आता पिंपरी चिंचवड भाजपने दबाव आणायला सुरुवात केली आहे. शहराला मंत्रीपद मिळावं यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट विधानसभेचा लेखाजोखा मांडला आहे. त्याचबरोबर आजवर शहराला न मिळालेलं मंत्रीपद यंदा मिळायला हवंचं अशी आग्रही भूमिका शहर भाजपने घेतली आहे. राज्यातील 285 मतदारसंघाच्या तुलनेत पिंपरी, चिंचवड आणि भोसरीत आम्ही बूथ लेव्हल वर सर्वोत्तम कामगिरी केली आहे. याचा लेखाजोखा पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडला आहे. ही कामगिरी पाहता शंकर जगताप आणि महेश लांडगे या दोघांपैकी एकाला मंत्रीपद द्यायला हवं, अशी दबावाची खेळी शहर भाजपने खेळली आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरी तीन विधानसभा येतात. लोकसभा निवडणुकीला इथे महायुतीच्या उमेदवारांना चिंचवड मधून 76 हजारांची आघाडी दिली. पिंपरी मधून 16000 मताची आघाडी दिली. भोसरीमधून 9000 मताच्या आघाडी दिली आणि त्यानंतर इथं शंकर जगताप अध्यक्ष झाल्यानंतर जी स्मूथ लेवलला किंवा खालच्या स्तरापर्यंत बुथ स्तरावर, शक्ति केंद्र मंडळ , आणि संघटनात्मक जी ताकद वाढली ती लोकसभेमध्ये दिसून आली. परवा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आली. तिन्हीही आमदार भारतीय जनता पार्टीने अथक परिश्रम करून कार्यकर्त्यांना तिन्ही आमदारला विजय केलं. पक्षाने जे नियोजन केलं ते शंकरराव जगताप यांच्या अध्यक्ष असलेल्या संघटने खाली केलं गेलं. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अशी मागणी आहे. आत्तापर्यंत कधीच मंत्री पद नाही मिळालं. तर पिंपरी चिंचवड शहरात तिन्ही आमदारांनी दिल्यामुळे आम्हाला पिंपरी चिंचवड शहराला एक भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्टीने मंत्रीपद द्यावं अशी कार्यकर्त्याची तमाम इच्छा आहे, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी
राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी करण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल शपथविधीनंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत दिले आहेत. त्यानुसार राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार हा पुढील आठवड्यात म्हणजेच 11 किंवा 12 डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरूवात होणार आहे, त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती महायुतीतील नेत्यांनीही माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्याआधी महायुतीतील पक्षांनी आपापल्या पक्षांतील बड्या नेत्यांसोबत बैठका चर्चा सुरू केल्याचं चित्र दिसून येत आहे.