Pimpri-Chinchwad Fire : पिंपरी चिंचवडमध्ये हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) चिखली भागातील एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Pimpri-Chinchwad Fire News : पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) चिखली भागातील एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहानग्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
पहाटेच्या सुमारास चिखलीमधील सचिन हार्डवेअरला ही आग लागली होती. याच हार्डवेअरमध्ये कुटुंब वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही आग इतकी भीषण होती की, आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. यामध्ये दोन लहानग्यांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळं ही भीषण आग लागली असल्याचा अग्निशामक दलाचा प्राथमिक अंदाज आहे. पिंपरी चिंचवड अग्निशामक दलानं ही आग नियंत्रणात आणली असून, कुलिंगचे काम सुरु आहे.
दुकानात ऑईल पेंट असल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं
पिंपरी चिंचवडमधील भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झालाय. चौधरी कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. चिखली येथील हार्डवेअर दुकानाला पहाटे पाचच्या सुमारास लागली होती. याच दुकानाच्या माळावर चौधरी कुटुंबीय राहत होतं. दुकानात ऑईल पेंट असल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं. याच पेंटच्या आगीने दुकानात वायू निर्माण झाला. आग आणि वायू यात गुदमरुन पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. राजस्थानचं हे कुटुंब हार्डवेअरचं दुकान चालवायचं आणि दुकानाच्या माळावर राहत होते. .
मृतांची नावे
चिमणाराम बेणाराम चौधरी ( पुरुष) वय 48
नम्रता चिमणाराम चौधरी (महिला) वय 40
भावेश चिमणाराम चौधरी (पुरुष मुलगा) वय 15
सचिन चिमणाराम चौधरी(पुरुष मुलगा) वय 13
महत्त्वाच्या बातम्या: