एक्स्प्लोर
पिंपरीत वाहन तोडफोडीचं सत्र सुरुच, थेरगावात 9 गाड्या फोडल्या

पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. थेरगावातील पडवळनगरमध्ये नऊ वाहनांची तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. सात ते आठ तरुणांनी गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती असून वाकड पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. तलवार आणि दांडक्यांने 9 गाड्यांची या टवाळखोरांनी तोडफोड केली होती. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
पिंपरीत दोन दिवस टोळक्यांचा धुडगूस, 50 वाहनांचा चुराडा
महिन्याभरातील गाड्यांच्या तोडफोडीची ही चौथी घटना असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून सवाल उपस्थित केला जात आहे. आपली वाहनं सुरक्षित नाहीत का, असा प्रश्न मनात असलेल्या वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.पुण्यातील बिबवेवाडीत 12 ते 15 गाड्यांची तोडफोड, चौघेे अटकेत
आणखी वाचा























