एक्स्प्लोर
पिंपरीत दोन दिवस टोळक्यांचा धुडगूस, 50 वाहनांचा चुराडा
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र अजुनही सुरुच आहे. गेल्या दोन दिवसात टोळक्यांनी घातलेल्या धुमाकूळात 50 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.
10 जूनला वाकडमध्ये दोन गटात झालेल्या हाणामारीत 20 गाड्या फोडल्या होत्या. हे प्रकरण ताजं असतानाच काल रात्री साडेनऊ वाजल्याच्या सुमारास खडकी परिसरात दुचाकीवरुन आलेल्या टोळक्याने 30 गाड्यांना लक्ष केलं.
परिसरात दहशत पसरवण्यासाठी किंवा आपापसातल्या वादातून हे प्रकार होत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र या प्रकारांवर आळा घालण्यात सध्यातरी पोलिसांना यश आलेलं नाही. त्यामुळे आणखी किती काळ नुकसान सहन करायचं असा संतप्त सवाल स्थानिक विचारत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement