एक्स्प्लोर
पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्येही पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार
स्थायी समितीने ‘पे अँड पार्क’चे धोरण सर्वसाधारण सभेत मांडले होते. विरोधकांसह भाजपच्याही काही नगरसेवकांनी यातील कमतरता दाखवून दिली. भाजपची अंतर्गत गटबाजी यानिमित्ताने समोर आली.

पिंपरी चिंचवड : पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवडकरांनाही रस्त्यांवर दिवस-रात्र वाहन पार्क करायला पैसे मोजावे लागणार आहेत. यावर आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सशर्त मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीने ‘पे अँड पार्क’चे धोरण सर्वसाधारण सभेत मांडले होते. विरोधकांसह भाजपच्याही काही नगरसेवकांनी यातील कमतरता दाखवून दिली. भाजपची अंतर्गत गटबाजी यानिमित्ताने समोर आली. सध्या शहराची लोकसंख्या 22 लाख आहे. 2011 च्या तुलनेत वाहनांची संख्या पावणे नऊ लाखाने वाढली असून ती आता पावणे सोळा लाखाच्या घरात पोहोचली आहे. लोकसंख्या आणि वाहनांची वाढलेली संख्या पाहता पार्किंगची समस्या शहराली भेडसावत आहे. त्यामुळे पालिकेच्या सर्वच रस्त्यांवर दिवस-रात्रीसाठी ‘पे अँड पार्क’च्या धोरणाला सशर्त मंजुरी देण्यात आली. नव्या धोरणानुसार पार्किंगचे दर : वाहन दिवसा (तासाला) रात्री ११ ते सकाळी ८ रात्रीसाठी (वार्षिक) दुचाकी दोन रुपये पाच रुपये 1 हजार 825 रिक्षा सहा रुपये 15 रुपये 5 हजार 475 चारचाकी 10 रुपये 25 रुपये 9 हजार 125 टेम्पो 10 रुपये 25 रुपये 9 हजार 125 मिनी बस 15 रुपये 38 रुपये 13 हजार 688 ट्रक 33 रुपये 55 रुपये 20 हजार 075 खाजगी बस 39 रुपये 58 रुपये 35 हजार 588
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























