नको बापट नको टिळक, पुणेकरांना पाहिजे नवीन ओळख', सोशल मीडियावर बॅनरची चर्चा
धीरज घाटे हे सानेगुरुजी नगर येथील भाजपचे विद्यमान नगरसेवक आहेत. "धीरज आम्हाला नाही तुझी गरज.. आता घरी जा परत'...', नको बापट नको टिळक पुणेकरांना पाहिजे नवीन ओळख... ",असे बॅनर लावले आहेत.
पुणे : पुण्यात 2022 च्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आराखडा जाहीर झाला आहे. यानंतर एक प्रकारे निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. त्यामुळे इच्छुक नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात बॅनरबाजी सुरू केली आहे. आजवर केलेल्या कार्याची माहिती देणारे फलक, उत्तर कुठेही कोणताही मदतीसाठी कॉल करा म्हणून सांगणारे फलक शहरात जागोजागी लागलेले दिसत आहेत.
पुण्यातील सानेगुरुजी नगर येथील नगरसेवक धीरज घाटे यांनी देखील असेच बॅनर लावले होते. परंतु या बॅनर विरोधात देखील आता बॅनरबाजी सुरू झाली आहे. धीरज घाटे हे सानेगुरुजी नगर येथील भाजपचे विद्यमान नगरसेवक आहेत. "धीरज आम्हाला नाही तुझी गरज.. आता घरी जा परत'...', नको बापट नको टिळक पुणेकरांना पाहिजे नवीन ओळख... ",असे बॅनर लावले आहेत. हे बॅनर नेमके कोणी लावलेत हे अजून अजून समजू शकलेलं नाही. मात्र या बॅनरची चर्चा चांगलीच रंगली आहे.
पुण्यातील सानेगुरुजी नगर येथील भाजप नगरसेवक धीरज घाटे यांनी बॅनर लावले आहे. या बॅनरवर घाटे यांनी "जिथे गरज तिथे धीरज", कोणत्याही मदतीसाठी फक्त एक कॉल करा अशी बॅनरबाजी केली आहे. या बॅनरच्या खालीच हे फ्लेक्स लावण्यात आले आहे.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या आराखड्यात पुण्याची 58 प्रभागांमधे विभागणी करण्यात आली आहे. या प्रभागांमधून 173 नगरसेवक निवडून जाणार आहेत. या आराखड्याचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक विद्यमान नगरसेवक या विकास आराखड्यानुसार एकाच प्रभागातून लढण्यासाठी इच्छुक राहण्याची शक्यता आहे. तर आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 122 जागा जिंकून सत्ता स्थापन करेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.
संबंधित बातम्या :
'निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे'चं अजब बॅनर लावणं महागात; भाजप आक्रमक, औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल