एक्स्प्लोर

ISKP Case : पुण्यातील कोंढवामधील संशयिताच्या घरावर NIA चा छापा

NIA ने पुण्यातील कोंढवामधील तल्हा खान या व्यक्तीच्या घरावर छापा टाकला. तो ISKP या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता आणि या संघटनेची विचारधारा पसरवण्याचे काम करत होता असा संशय एनआयएला आहे. 

पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुण्यातील कोंढवा भागातील तल्हा खान नावाच्या 38 वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा टाकून इस्लामिक स्टेटशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल साहित्य जप्त केलं आहे. तल्हा खान इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता आणि या संघटनेची विचारधारा पसरवण्याचे काम करत होता असा संशय एनआयएला आहे. 

या प्रकरणात जहानझीब वानी आणि त्याची बायको हिना बशीर बेग या काश्मिरी दाम्पत्याला मार्च 2020 मध्ये अटक करण्यात आल्यानंतर दिल्लीत लोधी कॉलनी पोलीस ठाण्यात 8 मार्च 2020 रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर एनआयएने 20 मार्च 2020 रोजी या प्रकरणाची पुन्हा नोंद केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अब्दुल्ला बसीत, सादिया अन्वर शेख, नबील सिद्दीकी खत्री आणि अब्दुल रहमान या चौघांना अटक करण्यात आली होती. 

सादिया अन्वर शेख आणि नबील सिद्दीकी खत्री यांना जुलै 2020 मध्ये एनआयएने अटक केली होती. तल्हा खान हा नबील सिद्दीकी खत्रीच्या संपर्कात असल्याचं एनआयएला तपासात आढळून आल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

जहानझीब वानी आणि हिना बेग हे पुण्यातील व्यायामशाळा चालवणाऱ्या खत्री तसंच सादिया यांच्या संपर्कात असल्याचं समोर आलं होतं. एनआयएने खत्रीवर भारतात हिंसक दहशतवादी हल्ले घडवण्यास मदत केल्याचा आरोप केला होता, तर सादियावर भारतात IS चे कॅडर तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. याशिवाय वानी आणि बेग हे हैदराबादच्या अब्दुल्ला बासितच्या संपर्कात होते, ज्याला ISIS च्या अबू धाबी मॉड्यूलशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली होती.

या प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून ISIS ची विचारसरणी पसरवण्याचा कट रचणे, ISIS साठी काम करण्यासाठी सेल स्थापन करणे, निधी उभारणे, शस्त्रे गोळा करणे, आयईडी बनवणे आणि टार्गेट करुन हत्या करणे, यांसारखे आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
Pune Crime news: पुण्याचा 'युपी-बिहार' झाला, रस्त्यात सर्वांदेखत नराधमाचं तरुणीसोबत नको ते कृत्य, उचलून नेण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
पुण्याचा 'युपी-बिहार' झाला, रस्त्यात सर्वांदेखत नराधमाचं तरुणीसोबत नको ते कृत्य, उचलून नेण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री राज्याचं वाळवंट करतायेत, कर्जतचा प्रकल्प पर्यावरण पूरक कसा? टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल 
मुख्यमंत्री राज्याचं वाळवंट करतायेत, कर्जतचा प्रकल्प पर्यावरण पूरक कसा? टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल 

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget