एक्स्प्लोर
नीरा-भिमा नदीजोड प्रकल्पातील बोगद्यातील क्रेन कोसळली, सात कामगारांचा मृत्यू
नीरा-भिमा नदीजोड प्रकल्पासाठी तयार करण्यात येणारा बोगद्यातील क्रेन कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पुणे : नीरा-भिमा नदीजोड प्रकल्पासाठी तयार करण्यात येणारा बोगद्यातील क्रेन कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुण्यातील निरा-भिमा नदी जोड प्रकल्पाचं बांधकाम सुरू असताना क्रेन उलटल्यानं सात कामगारांचा आज मृत्यू झाला. 150 मीटर खोल बोगद्यातून बाहेर येताना क्रेन उलटल्यानं ही दुर्घटना घडल्याचं समजतं आहे. पुण्यातल्या तावशी ते डाळज दरम्यान नीरा-भीमा नदी जोडप्रकल्पाचं काम सुर आहे. नदी जोडो प्रकल्पासाठी मोठ्या बोगद्याचं खोदकाम सुरू असताना क्रेन उलटली आणि सात कामगारांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























