एक्स्प्लोर

लोकशाहीचा खेळखंडोबा चालला आहे, अजित पवार सरकारवर भडकले

Ajit Pawar : कालाचा दसरा कसं झाला बघितला. बीकेसी, शिवाजी पार्क. पांढरे कपडे घातले. महागाईवर कोणी बोलत नाही. लोकशाहीचा खेळ खंडोबा चालला आहे.

Ajit Pawar : कालाचा दसरा कसं झाला बघितला. बीकेसी, शिवाजी पार्क. पांढरे कपडे घातले. महागाईवर कोणी बोलत नाही. लोकशाहीचा खेळ खंडोबा चालला आहे. अधिकाऱ्यांना कळेना कुणाचे ऐकायचे. यातून विकसावर परिणाम होतो.  सत्तेत बसायला आकडा लागतो. सट्टाचा आकडा नाही. 145 चा आकडा लागतो, असे अजित पवार म्हणाले. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ मोळी पूजन करून  अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा 61 वा गळीत हंगामाचा शुभारंभ विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुळी पूजन करून गव्हाण पूजन करण्यात आले त्यानंतर शेतकरी मेळाव्याला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हजेरी लावली. या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी शेतकऱ्यांना संबोधित केलं. 

15 तारखेपासून गळीत हंगाम सुरू होईल. आधी कारखाना सुरू करावा अशी मागणी होती परंतु रिकव्हरी कमी बसते. मागच्या वर्षी ऊसाचा हंगाम लांबला.. परंतु यंदा अनेक कारखान्यांनी विस्तार वाढ केली आहे.. त्यामुळे पहिल्या दिवसापासून उसाचे गाळप वाढणार आहे. उस्मानाबादमध्ये गेलो होतो. तिकडे 2200 रुपये म्हणजे फार भाव झाला. यंदा आम्ही बिराजदार आणि बाणगंगा साखर कारखान्याने 2450 दर दिला लोकांनी डोक्यावर घेतले..येथे 3 हजार दर दिला तरी एक टाळी वाजत नाही.. तो तुमचा अधिकार आहे त्याबद्दल मी काही बोलणार नाही, असे अजित पवार म्हणाले. 

अजित पवार म्हणाले की, भीमा पाट्स कारखान्याला जिल्हा बँकेच्या माध्यमातून 38 कोटींची सवलत दिली. शिक्षण संस्थेत पवार कुटुंबियांनी 6 कोटी दिले. 5 वर्षात दामदुप्पट होते..आता त्याचे 15 कोटी झाले असते..  गळ्याच्याने खोटं बोलत नाही.. तेव्हा माहीत नव्हतं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. सांगितले असते तर त्यांना केलं असते. पण कधी गेले काही कळलंच नाही. कारखान्यामुळे प्रदूषण होता कामा नये. कायदे कडक आहे. कोरोना काळात आपण ऑक्सिजनला किती महत्त्व आहे आपण पाहिले. काही जण म्हणत होते रुग्णाला जास्त ऑक्सिजन द्या. कोरोना काळात आम्ही मर मर काम केलं. वाचन कमी होत चालल आहे. वाचाल तर वाचाल बाबांनो, वाचाल तर जगाल. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष दिगंबर दुर्गडे यांनी 50 हजार वाचनालायला दिले अशी घोषणा केली. ते पैसे दुर्गडे सर देणार आहेत. त्यांच्याकडून घ्या. नाहीत म्हणाल हा बाबा म्हणाला होता देतो म्हणून.

सोमेश्वर कारखान्यात 90 हजार लिटर प्रति दिन इथेनॉल करण्याचा आपला मानस आहे.  5 किलो ऐवजी 10 किलो साखर द्या अशी मागणी सभासदांनी केली आहे.  साखर खाल्ली तर शरीरासाठी अपायकारक आहे. कारखान्याचे संचालक देखील म्हणतात बिना साखरेचा चहा आणा. त्यामुळे जास्त साखर खाऊ नका. सभासदांना किती साखर दिली जाते हे सांगताना अजित पवार कन्फ्युज झाले. त्यावर सभासदांनी दुरुस्ती केली..त्यावर अजित पवार म्हणाले तुमचा खरं आमची जाहीर माघार, जास्त तानायचे नाही. अमिताभ बच्चन कोन बनेगा करोडपती म्हणतात. हे बघा 25 लाख रुपये थेट तुमच्या खात्यात आले..आले. बघा आले कोण बघायला जाते खरंच गेलेत का ते, असेही अजित पवार म्हणाले. 

आम्ही मंजूर केलेली कामाला यांनी स्थगिती दिली..आम्ही कोर्टात गेलो. त्यांना विनंती केली आहे. सत्ता येते जाते.. हा चुकीचा पायंडा पडेल. जर दर पाहिजे असेल तर चांगला ऊस लावला.. तू मला कोणते बेणे दिले?  असं अजित पवारांनी छत्रपती सहकारी कारखान्याच्या चेअरमनला विचारले. त्यावर प्रशांत काटे म्हणाले 6005 उसाचे बेणे दिले असं सांगितले.. त्यावर अजित पवार म्हणाले बेण्याचे  पैसे द्यायचे राहिले आहेत. मी देतो काळजी करू नको, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. 

जरा रानात लक्ष द्या. एकनाथ शिंदेचे काय चाललं आहे त्याचा विचार करू नका. अजित पवारचे उपमुख्यमंत्री पद गेलं आता त्याचं काय सुरू असेल असा विचार करत बसू नका. अजित पवार तेव्हा पण काम करत होता आता पण काम करतो आहे. मी लग्नाच्या आधीपासूनच कारखान्याचा डायरेक्ट आहे. भरनेवाडीने मला निवडून दिले. नाहीतर मी पडलोच असतो.. त्यामुळे आम्हाला कारखान्यतले कळते..उत्तर प्रदेश सरकारने कलकत्ता मार्केट काबीज केला आहे. त्याचा फटका आपल्याला बसणार आहे. त्यावर मी सरकारला सांगितले जावा पीयूष गोयला यांना भेटा. आपण कलकत्ता बंदर आपल्याला घ्या, नाहीतर एका साखरेच्या पोत्याला दीडशे रुपये जास्त मोजावे लागतील., असे  अजित पवार म्हणाले. 

आम्ही सरकारमध्ये नसताना आपले पाणी नेलं. कुणी शब्द काढला नाही. आपलं सरकार आलं आणि तो निर्णय फिरवला.. नाहीतर आता धुरळा झाला असता विचारा अधिकाऱ्यांना.. कॉनॉलला जिथे वळण आहे तिथे लायनींग करायचे आहे. कारण कनॉलला जिथे वळण आहे तिथे गळती होत आहे..तुमची परवानगी असेल तर लायनींग करू. खराब ठेकेदार असेल 50 वर्षात काम डबघाईला येते, जर चांगला ठेकेदार असेल 100 वर्ष काम चालते. कनॉलला 135 वर्ष झाले आहेत.. मातीचा कनॉल आहे तो. तुमचा पाठिंबा असेल तर आपण अस्तरीकरण करू. विहिरीचे पाणी जाणार नाही. आणि चुकून जर गेलं तर आहे की पोकलेन उकरून काढू. हयगय नाही करायची, असे अजित पवार म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget