एक्स्प्लोर

नफेखोर शिक्षणसंस्थांना वठणीवर आणणार : विनोद तावडे

मुंबई : फी नावाखाली पालकांकडून अवाजवी रक्कम उकळणाऱ्या पुण्यातल्या नामांकित शाळांना दणका मिळालाय. फी वाढी विरोधातल्या सुनावणीनंतर विबग्योर आणि सिंहगड स्प्रिंगडेल या दोन शाळांना फी वाढ रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या उपस्थितीत पुण्यातल्या 6 शाळांची फी वाढीविरोधात सुनावणी पार पडली. या शाळा प्रशासन आणि पालकांच्या बैठकीत फी वाढीचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा शाळांनी केला. मात्र, त्याबाबत ठोस पुरावे देऊ न शकल्यामुळं शाळांनी फी वाढ मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान इतर शाळांबाबत तावडे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नफेखोरी करणाऱ्या शिक्षणसंस्थांना वठणीवर आणण्याचा इशारा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे. पुण्यातल्या सहा शाळांनी केलेल्या फीवाढी विरोधात तावडेंसमोर मुंबईतल्या कार्यालयात सुनावणी झाली. सीबीएसई आणि आयसीएसई मधील कोणत्याही शाळांना पुस्तके त्याच शाळेतूनच घेण्याची सक्ती करता येणार नाही, विद्यमान शुल्क नियंत्रण कायद्यात लवकरच सुधारणा करण्यात येईल, तसेच कोणत्याही शाळांना अथवा शिक्षणसंस्थांना नफेखोरी करु देणार नाही. जर अशा पद्धतीची नफेखोरी झाल्याचं आढळून आल्यास संबंधित शाळा व शिक्षण संस्थांना वठणीवर आणण्यात येईल, असं तावडे म्हणाले. विबजियॉर, युरो, इंदिरा इंटरनॅशनल स्कूल, महर्षी कर्वे शाळा यासारख्या सहा प्रसिद्ध शाळांचा समावेश होता. सुनावणीदरम्यान तावडेंनी शाळांना बॅलन्सशीट आणि ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीच्या वेळी पालकांचं शिष्टमंडळ आणि शिक्षणसंस्थाचे संचालकही उपस्थित होतं. आज झालेल्या सुनावणीचा रिपोर्ट फी संदर्भात स्थापन केलेल्या समितीकडे सोपवला जाणार आहे. पुण्यातल्या 18 शाळांनी 15 ते 50 टक्के इतकी अवाजवी फीवाढ केल्याचा आरोप पालकांकडून होत आहे. पहिल्या सुनावणीला सुरुवात झाली असून इतर शाळांची सुनावणी येत्या काही दिवसातच होईल. फीवाढीविरोधातली ही सुनावणी म्हणजे एक फार्स आहे आणि त्यासंदर्भात पालकांमधे जागरुकतेसाठी एसएमएस मोहीम सुरु करणार असल्याचं 'फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन'च्या जयंत जैन यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Assembly Election 2025: अगोदरच उतरती कळा, त्यात पृथ्वीबाबांच्या वक्तव्याने गदारोळ, संजय राऊत म्हणाले, खरं आहे, आता पृथ्वीराज चव्हाण म्हणतात....
अगोदरच पक्षाला उतरती कळा, त्यात पृथ्वीबाबांच्या वक्तव्याने गदारोळ, वादानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,....
पानाच्या पिचकाऱ्यांनी भिंती लाल भडक,तंबाखूच्या पुड्या, कचरा..सरकारी इमारत आहे की खंडर?
पानाच्या पिचकाऱ्यांनी भिंती लाल भडक,तंबाखूच्या पुड्या, कचरा..सरकारी इमारत आहे की खंडर?
Torres Scam : 13.76 कोटींचं बोगस कर्ज, 75 किलो सोनं,25 किलो चांदी बेकायदेशीरपणे भारतात, टोरेस घोटाळा प्रकरणी धक्कादायक माहिती 
75 किलो सोनं बेकायदेशीरपणे भारतात, मुंबईतल्या काळंबादेवीतील ज्यूसच्या दुकानाशी कनेक्शन? टोरेस घोटाळ्याप्रकरणी नवी अपडेट
Lamborghini : मंत्रालयात लॅम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
मंत्रालयात लॅम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : दिल्लीत काँग्रेस- आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं; राऊतांचा काँग्रेसला इशाराPune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटकDelhi Anil Desaiदिल्लीत मतांचं विभाजन होणार नाही;आपचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा होताBeed Santosh Deshmukh Family : आज बाबा असते तर.. हत्येला 1 महिना उलटला; लेकीची भावूक प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Assembly Election 2025: अगोदरच उतरती कळा, त्यात पृथ्वीबाबांच्या वक्तव्याने गदारोळ, संजय राऊत म्हणाले, खरं आहे, आता पृथ्वीराज चव्हाण म्हणतात....
अगोदरच पक्षाला उतरती कळा, त्यात पृथ्वीबाबांच्या वक्तव्याने गदारोळ, वादानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,....
पानाच्या पिचकाऱ्यांनी भिंती लाल भडक,तंबाखूच्या पुड्या, कचरा..सरकारी इमारत आहे की खंडर?
पानाच्या पिचकाऱ्यांनी भिंती लाल भडक,तंबाखूच्या पुड्या, कचरा..सरकारी इमारत आहे की खंडर?
Torres Scam : 13.76 कोटींचं बोगस कर्ज, 75 किलो सोनं,25 किलो चांदी बेकायदेशीरपणे भारतात, टोरेस घोटाळा प्रकरणी धक्कादायक माहिती 
75 किलो सोनं बेकायदेशीरपणे भारतात, मुंबईतल्या काळंबादेवीतील ज्यूसच्या दुकानाशी कनेक्शन? टोरेस घोटाळ्याप्रकरणी नवी अपडेट
Lamborghini : मंत्रालयात लॅम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
मंत्रालयात लॅम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
McDonald in Baramati: रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
Embed widget