एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रगती एक्स्प्रेस आता नव्या रुपात नव्या ढंगात
महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि पर्यटनस्थळांच्या छायाचित्रांचाही समावेश करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर दररोज धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसचं रुप बदललं आहे. आजपासून (4 नोव्हेंबर) चकाचक प्रगती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
‘उत्कृष्ट रेक’ प्रकल्पांतर्गत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने प्रगती एक्स्प्रेसच्या अंतर्गत बदल केले आहेत. एक्स्प्रेसमध्ये मोठय़ा प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. एक्स्प्रेसच्या डब्ब्यांना आकर्षक रंग देण्यात आले आहे. तसेच डब्यांच्या अंतर्गत भागामध्ये आकर्षक नक्षी साकारण्यात आली आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि पर्यटनस्थळांच्या छायाचित्रांचाही समावेश करण्यात आला आहे. खिडक्यांना पडदे, प्रत्येक डब्यात माहिती दर्शविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फलक लावण्यात आले आहेत. तसेच गाडीतील स्वच्छतागृहाच्या रचनेतही विविध बदल करण्यात आले आहेत. अधिक स्वच्छता राखता यावी यासाठी शौचालयामध्ये सिरामिक टाईल्स बसविण्यात आले आहेत. फर्शीवरून पाय घसरू नये, यासाठी विशेष प्रकारची चटईही स्वच्छतागृहात बसविण्यात आली आहे.
हवा खेळती राहावी यासाठी खास पद्धतीने खिडक्या तयार करण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी डब्यात भरपूर उजेड राहावा यासाठी एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. हवेसाठी गाडीत नवीन पंखे बसविण्यात आले आहेत.
नव्या प्रगतीची खास वैशिष्ट्य
- कोच संकेत बोर्ड
- ब्रेल स्टिकर्स
- रेल्वेची माहिती देणारे पोस्टर
- स्वदेशी डिझाइनची व्हेंटिलेशन विंडो
- अँटी स्किड टाईल्स आणि स्क्रॅप मॅट्स
- अॅक्रेलिक मोबाइल होल्डर
- प्रवासी माहिती प्रणाली
- सामान ठेवण्यासाठी खास स्टेनलेस स्टील रॅक
- फायबर वॉश बेसिन आणि लाकडी आरसा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement