Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आजपासून 12 ते 3 दरम्यान ब्लॉक, तीन दिवस वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गांचा करा वापर
Mumbai-Pune Expressway : मुंबई वरुन पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आलेत. वळवण ते वरसोली टोल नाका येथून देहूरोड मार्गे सर्व वाहतूक पुण्याकडे वळविण्यात आलेली आहे.
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आजपासून तीन दिवसांचा ब्लॉक सुरु झाला आहे. दुपारी बारा ते तीन या दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. पुलाचे गर्डर्स बसवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसे ने हा निर्णय घेतला आहे. कुसगांव हद्दीतील किलोमीटर 58/500 जवळ पुलाचे गर्डर्स बसविण्याचं काम युद्धपातळीवर केलं जाणार आहेत. यासाठी पुढील तीन दिवस (22, 23 आणि 24 जानेवारी) दुपारी 12 ते 3 या वेळेत हे काम पूर्ण केलं जाणार आहे. (Mumbai-Pune Expressway)
या दरम्यान मुंबई वरुन पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आलेत. वळवण ते वरसोली टोल नाका येथून देहूरोड मार्गे सर्व वाहतूक पुण्याकडे (Mumbai-Pune Expressway) वळविण्यात आलेली आहे. दुपारी तीन नंतर पुन्हा एकदा द्रुतगती मार्ग खुला केला जाईल. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीत कोणताही बदल नसेल, तिन्ही दिवस मुंबईकडे जाणारी वाहतूक द्रुतगतीवरून सुरु राहिल. या ब्लॉक दरम्यान एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक ही जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून देहूरोड मार्गे वळवण्यात येणार असल्याची माहिती आहे.(Mumbai-Pune Expressway)
या पर्यायी मार्गांचा करा वापर
- दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान वाळवण ते वरसोली टोलनाक्यापासून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून पुण्याकडे जाऊ शकता.
- पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ही पूर्णपणे सुरळीत असणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
- काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी तीन नंतर पुन्हा तुम्ही या महामार्गावरून आपला प्रवास करू शकता.
- ब्लॉक दरम्यान कुठलीही अडचण आल्यास मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी 9822498224 या क्रमांकावर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवू शकता.