एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

डीएसकेंनी फसवलं, अटकेपासून संरक्षण नाही : हायकोर्ट

डीएसके हायकोर्टात हजर होते, तेव्हाच आम्ही जामीन अर्ज रद्द केला असता, पण तेव्हाही आशेचा एक किरण होता, असं मुंबई हायकोर्टाने सांगितलं.

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्यात आली. डीएसकेंनी हायकोर्टाची फसवणूक केल्याचं स्पष्ट झालं, अशा शब्दात हायकोर्टाने संताप व्यक्त केला. अंतिम निर्णय जरी 22 फेब्रुवारीला होणार असेल, तर डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण आम्ही आज दूर करतो, असं हायकोर्टाने स्पष्ट केलं. डीएसके हायकोर्टात हजर होते, तेव्हाच आम्ही जामीन अर्ज रद्द केला असता, पण तेव्हाही आशेचा एक किरण होता, असं हायकोर्टाने सांगितलं. डीएसकेंचे पासपोर्ट जमा करा अशा सूचना हायकोर्टाने सर्व विमानतळांना तातडीनं देण्याचे आदेश दिले. डीएसकेंनी आपला पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा केल्याची माहिती कोर्टाला दिली. त्यावर, कशावरुन डीएसकेंकडे एकच पासपोर्ट असेल? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला.
डीएसकेंचा बनाव उघड, जामीन अर्जावर तातडीची सुनावणी
तुमच्याकडे लोकांचाच पैसा आहे, हे ध्यानात ठेवण्यासही हायकोर्टाने बजावलं. त्याचप्रमाणे कागदपत्रांची पूर्ण छाननी न करताच तुम्ही कर्ज द्यायला कसे तयार झालात, अशा शब्दात बुलडाणा अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीला हायकोर्टाने समज दिली. गुंतवणूकदारांचा कोर्टावरील विश्वास उडत चालला आहे. देशात दररोज 10 -12 हजार कोटींचे नवनवे घोटाळे उघड होत आहेत. 12 कोटींचा डीडी डीएसकेंना कोणत्या आधारे दिला होता, असा सवालही हायकोर्टाने विचारला. डीएसकेंना आता एकही संधी देण्याची इच्छा नाही, मात्र गुंतवणूकदारांबद्दल वाईट वाटत आहे. डीएसकेंच्या खात्यात परदेशातून एकही पैसा येणार नाही, असं तपासयंत्रणांनी सांगितलं होतं, तरीही तुम्हाला संधी दिली, असंही हायकोर्ट म्हणालं. "लोकांचा माझ्यावर विश्वास आहे" असं कुठल्या तोंडानं तुम्ही माध्यमांत जाऊन सांगता? आम्ही तुमच्या मुलाखती पाहिल्या आहेत, असं हायकोर्टानं डीएसकेंना सुनावलं. मालमत्ता जरी बँकेच्या ताब्यात असली तरी विकण्याची मुभा असते, विकत घेणाऱ्याला याची पूर्वकल्पना दिल्यास चिंतेचं काही कारण नसावं, असा दावा डीएसकेंच्या वतीने करण्यात आला. काय आहे नेमकं प्रकरण? गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आली आहे. यामुळे गुंतवणुकदार गोत्यात आले आहेत. यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी अर्थात डीएसके आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहेत. मध्यमवर्गीयांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळवून देणारा बिल्डर म्हणून डीएसकेंनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. पण आता गुंतवणुकदारांची अडचण झाली आहे. डीएसकेंकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्यानं लोक त्यांच्या कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत. 2014 पासून अनेकांनी घर बूक केलं आहे. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. 2014 पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हापासून गाडी रुळावरुन घसरली. स्वप्नवत वाटणाऱ्या या ड्रीम सिटीत काय नव्हतं, कृत्रिम नद्या, त्यातून सर्व शहराला जोडणारी जलवाहतूक. कल्पनेच्या पलिकडचं विश्व साकारण्याची डीएसकेंची इच्छा होती. या प्रोजेक्टसाठी त्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगत तीनशे एकर जागा निवडली. 19 डिसेंबर 2014 ला या योजनेचा थाटात शुभारंभ केला. सर्व सुखसोयींनी संपन्न असणाऱ्या वनबीएचके फ्लॅटची किंमत तब्बल 70 लाखांपेक्षा जास्त होती. स्वप्नवत वाटणाऱ्या हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी डीएसकेंनी आपली सारी आर्थिक ताकद पणाला लावली. इतर व्यवसायातून येणारी सर्व आर्थिक रसद त्यांनी ड्रीम सिटीकडे वळवली. शेअर बाजारातूनही पैसा उभा केला. मात्र या प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी करताना डीएसकेंनी पत्नी आणि नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहोचवल्याचा आरोप होतो आहे. अशाप्रकारे डीएसकेंनी लोकांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. लोकांकडून आणखी पैसे कर्जरुपात घेण्यासाठी डीएसकेंनी आकर्षक योजनांची सुरुवात केली. ठेवींवर 12 टक्के व्याज देण्याचं आश्वासन दिलं. परिणामी हजारो लोकांनी लाखो रुपये डीएसकेंकडे गुंतवले. सुरुवातीला काही महिने लोकांना व्याज मिळालं. पण आर्थिक चणचण जाणू लागल्यानंतर लोकांना पैसे परत करणं डीएसकेंसाठी कठीण होत गेलं. मग ठेवीदार डीएसकेंच्या कार्यालयात फेऱ्या मारु लागले. त्यातून मार्ग काढण्यासाठी डीएसकेंनी इतर व्यवसायातील पैसा बांधकाम व्यवसायाकडे वळवला. मात्र, त्यामुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिकट बनली डीएसकेंच्या वीसहून अधिक कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांचे पगारही थकले आहेत. स्वतः डीएसके आणि त्यांच्या पत्नी ही परिस्थिती मान्य करतात. मात्र सगळं खापर नशिबावर फोडतात. आर्थिक मंदी आणि नोटबंदीमुळे अनेक उद्योगांचं कंबरडं मोडलं आहे. आपणही त्यामुळेच अडचणीत आल्याचा दावा डीएसके करत आहेत.

संबंधित बातम्या :

डीएसकेंना तूर्तास दिलासा, बुलडाणा अर्बन बँक मदतीला धावली!

डीएसकेंकडून 12 कोटींच्या संपत्तीची कागदपत्रे लिलावासाठी कोर्टात सादर

"डीएसके, पैसे उसने घ्या किंवा भीक मागा, पण रिकामे येऊ नका

कोठडीत पाठवायला एक क्षण पुरे, हायकोर्टाची डीएसकेंना तंबी

कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kangana Ranaut Slap Video : कंगना रणौतला लगावली कानशिलात,  विमानतळावरील EXCLUSIVE व्हिडीओABP Majha Headlines : Maharashtra News Update : 09 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Congress Victory : मरगळेल्या काँग्रेस पक्षात प्राण कुणी फुंकले? झीरो अवरमध्ये चर्चाZero Hour PM Modi vs RSS : राष्ट्रीय सयंसेवक संघाचा नरेंद्र मोदी यांना विरोध? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Dombivli MIDC Blast : आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
Rahul Gandhi : खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिणाम, पीएम मोदी-अमित शाहांचा थेट सहभाग; राहुल गांधींचा गंभीर आरोप, जेपीसी चौकशीची मागणी
Embed widget