एक्स्प्लोर

Mumbai Crime News: मुलांसह खेळायला आलेल्या चिमुरडीसोबत शेजाऱ्याकडून नको ते कृत्य; डोंबिवलीत धक्कादायक प्रकाराने खळबळ

Mumbai Crime News: डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मुंबई: राज्यासह देशभरात बदलापूरात घडलेल्या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. अशातच बदलापूरची ताजी घटना असतानाच डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोंबिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका गावातील दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना दुपारच्या  सुमारास घडली आहे. मानपाडा पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (Neighbors sexual assault 10 year old girl who came to play with children in Dombivli)

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आरोपीच्या मुलांसोबत खेळण्यासाठी गेली असता आरोपीने मुलीवर अत्याचार (Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. मानपाडा पोलिसांनी या घटनेची दखल घेत पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी धर्मेंद्र यादव या 32 वर्षे आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकून कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

बदलापूरसह राज्यात अत्याचाराच्या अनेक घटना

बदलापूर पूर्वेला असणाऱ्या एका नामांकित शाळेतील दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याच्या संतापजनक प्रकार उजेडात आला. या संपूर्ण प्रकारचे पडसाद आता राज्यासह देशातही उमटत असताना राज्यात अशाच प्रकारची अनेक प्रकरणे पुढे आले आहे. बदलापूर पाठोपाठ (Badlapur Crime) राज्यात पुणे, अकोला, ठाणे येथे देखील अशाच पद्धतीने लैंगिक अत्याचाराच्या घटना उजेडात आल्या आहे. त्यामुळे सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागलाय.

पुण्यातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बदलापूर,अकोला पाठोपाठ पुण्यात देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे, पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा (Pune Crime News) प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यातील भवानी पेठ भागातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घडला आहे. पीडित मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. आरोपी तरुण हा त्याच शाळेतील विद्यार्थी असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील १९ वर्षीय आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर आपली चिमुरडी मुलं शाळेत देखील सुरक्षित नसल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अत्याचाराच्या मोठ्या घटना 

राज्यात मागील काही दिवसांमध्ये मोठ्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. बदलापूरमध्यो दोन चिमरड्या मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तर त्यानंतर पुणे, अकोल, मुंबईतील खारघर, पुणे जिल्ह्यातील दौंड जिल्ह्यात अशा एक ना अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पालक आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

'तू मला आवडतेस' शाळेतील स्कूल व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीला इंस्टाग्रामवर मेसेज

शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात स्कूल व्हॅन चालकाने मेसेज करुन मुलीची छेड काढल्याची (Pune Crime News) घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस येताच मनसे कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅन चालकाला याचा जाब विचारत चांगलाच चोप दिला आहे. शाळेतील स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थिनीला 'तू मला आवडतेस' असे मेसेज केले होते. स्कूल व्हॅन चालक वारंवार प्रत्यक्ष आणि इंस्टाग्रामवर सतत मेसेज करून विद्यार्थिनीला त्रास देत होता. या घटनेनंतर पालकांनी संताप (Pune Crime News) व्यक्त केला आहे, आम्ही तुमच्या विश्वासावर आमच्या मुलींना शाळेत पाठवतो आणि तुम्ही अशी कृत्ये करता असं म्हणत पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तर स्कूल व्हॅन चालकावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50 रुपये पगार मिळवा
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
मोठी बातमी! नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात, कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पडला पाय...
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Embed widget