एक्स्प्लोर
मोहसीन शेखच्या हत्येचा आरोपी धनंजय देसाईसह दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
2014 मध्ये बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सोशल मीडियातील आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात दंगल उसळली होती. या दंगलीत संगणक अभियंता मोहसीन शेख याची हत्या करण्यात आली होती.

पुणे : जमावबंदी आदेशाचा भंग करुन पुण्यात बेकायदा रॅली काढल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाई आणि त्याच्या शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगणक अभियंता मोहसीन शेख हत्येप्रकरणी जामीनावर सुटका झालेल्या धनंजय देसाईच्या समर्थनार्थ त्याच्या कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे घेऊन पुण्यात रॅली काढली होती.
2014 मध्ये बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सोशल मीडियातील आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात दंगल उसळली होती. या दंगलीत संगणक अभियंता मोहसीन शेख याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईसह 23 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.
VIDEO | बेकायदा रॅली काढल्याप्रकरणी धनंजय देसाई आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा | पुणे | एबीपी माझा
स्पेशल रिपोर्ट : आक्षेपार्ह पोस्टने शहर पेटलं आणि दोन कुटुंबं उद्ध्वस्त झाली
यानंतर 17 जानेवारी 2019 रोजी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर धनंजय देसाईला जामीन मिळाला होता. धनंजय देसाईची तीन दिवसांपूर्वी येरवडा कारागृहातून जामीनावर सुटका करण्यात आली. यावेळी धनंजय देसाई याचे शेकडो समर्थक त्याला घेण्यासाठी येरवडा कारागृहाजवळ जमा झाले होते. त्यानंतर भगवे झेंडे घेऊन शहरात रॅली काढण्यात आली.
मोहसीन शेख हत्या प्रकरणी धनंजय देसाईला जामीन
मोहसीन शेख हत्येप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख अटकेत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
