Maval Loksabha Consitituency : मावळ लोकसभेत मनसेचं इंजिन शर्तीत अडकलं?
राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय खरा पण मावळ (Maval Loksabha Election) लोकसभेत मनसेच इंजिन शर्तीत अडकल्याचं दिसतंय.
![Maval Loksabha Consitituency : मावळ लोकसभेत मनसेचं इंजिन शर्तीत अडकलं? Maval Loksabha Consitituency MNS Not Actively Support Shrirang barne In maval Loksabha maharashtra News Maval Loksabha Consitituency : मावळ लोकसभेत मनसेचं इंजिन शर्तीत अडकलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/16/056965a5647da8ec810f27cad73b698b1713249957530442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मावळ, पुणे : राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय खरा पण मावळ (Maval Loksabha Election) लोकसभेत मनसेच इंजिन शर्तीत अडकल्याचं दिसतंय. राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्यापासून पिंपरी चिंचवड मनसे अजूनही श्रीरंग बारणेंच्या प्रचारात दिसत नाबीये. मनसेचा पाठिंबा महायुतीला असला तरी पिंपरी मनसे मनाने अद्याप ही महाविकासआघाडीत चं त्यांच्या वक्तव्यातून दिसून आलं. पिंपरी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखलेंनी सगळे पदाधिकारी कामाला लागतील, असं सांगितलं आहे. मात्र अजूनतरी कोणीही या प्रचारात सक्रिय झाल्याचं दिसत नाही आहे.
सचिन चिखले म्हणाले, राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये सांगितले आहे की महायुतीला आपलं पूर्णपणे पाठिंबा बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. मावळ ध्ये जे महायुतीचे उमेदवार आहेत. श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते मनसैनिक पदाधिकारी कामाला लागतील. दोन-तीन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष यांच्यामधला दुवा ठरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक पदाधिकारी नेमला जाणार आहे. आपली आणि त्यांची कनेक्टिव्हिटी कशी राहील कशा पद्धतीने पुढे जायचं त्या दृष्टिकोनातून संपर्क कसा चालवला जाईल. हे सांगितलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरेंच्या आदेशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मावळ लोकसभेच्या कामाला लागले. लवकरच बिनशर्त हा पाठिंबा आहे. पदाधिकारी नेमका की लगेच सगळे कामाला लागून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहोत.
एकीकडे बारामती लोकसभा मतदार संघात राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकांवर राज ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला होता. महायुतीला पाठिंबा देताच प्रचार पत्रकांत बदल करण्यात आला होता आणि मनसेचे कार्यकर्तेदेखील सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सहभागी झाल्याची माहिती आहे. मात्र मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात अजूनही कार्यकर्ते सक्रिय झाल्याचं दिसत नाही आहे. बैठकी घेतल्या जात नाही आहेत. शिवाय एकत्र फिरतानादेखील दिसत नाही आहे. येत्या काळात पदाधिकारी नेमला जाईल आणि नंतर या प्रचार मोहिमेत सहभागी होणार असल्याचं सांगण्याच येत आहे. मात्र कधी होणार?, यासंदर्भात अजून कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
पाहा व्हिडीओ-
इतर महत्वाची बातमी-
फडणवीसांकडून आमदारकीची ऑफर, उत्तम जानकर काय भूमिका घेणार? 19 एप्रिलला निर्णय जाहीर करणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)