एक्स्प्लोर

Manorama Khedkar: मनोरमा खेडकरच्या जामिनावर आज निकाल! मुलगी पूजा खेडकर फरार, पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची वकिलांनी व्यक्त केली शक्यता

Manorama Khedkar: पुण्यातील मुळशी तालुक्यात स्थानिक शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत धमकवल्या प्रकरणी मनोरमा खेडकरच्या जामिनावर सरकारी पक्ष, मूळ फिर्यादी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे.

Manorama Khedkar: आपल्या कारनाम्यामुळे चर्चेत आलेल्या खेडकर कुटुंबाच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून येत आहे. एकीकडे यूपीएससीने आयएएस पद काढून घेतल्यानंतर दुसरीकडे उच्च न्यायालयानेही पूजा खेडकरला (Pooja Khedkar) दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन नाकारला असून तिला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. यूपीएससीने दिल्ली पोलिसांकडे पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर तिचे वडिल दिलीप खेडकर यांचाहीतपास सुरू आहे. तर कोठडीत असेलेली पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरच्या (Manorama Khedkar) जामिन अर्जावर आज निकालाची शक्यता आहे.

पुण्यातील मुळशी तालुक्यात स्थानिक शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत धमकवल्या प्रकरणी मनोरमा खेडकरच्या (Manorama Khedkar) जामिनावर सरकारी पक्ष, मूळ फिर्यादी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आज (शुक्रवारी 2 ऑगस्ट) मनोरमा खेडकरच्या जामिनावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

सत्र न्यायाधीश अजित मरे यांच्या न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मनोरमा खेडकर प्रकरणात बचाव पक्षातर्फे अॅड. सुधीर शहा, सरकारी पक्षातर्फे अॅड. कुंडलिक चौरे आणि मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड. अमेय बलकवडे यांनी बाजू मांडली. या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष गोळीबार झाला नाही. त्यामुळे खुनाच्या प्रयत्नाचे कलम लागू होत नाही. तिच्याकडे पिस्तुलाचा परवाना आहे. त्यामुळे आर्म अॅक्ट लागू होत नाही. मनोरमा खेडकर (Manorama Khedkar)नी स्वरक्षणासाठी पिस्तुल वापरते आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे अॅड. सुधीर शहा यांच्याकडून करण्यात आला आहे. 

वादग्रस्त असलेली मनोरमा खेडकरची (Manorama Khedkar) मुलगी पूजा खेडकर (Pooja Khedkar) फरार आहे. तिच्याकडून पुराव्यामध्ये छेडछाड केली जाऊ शकते. त्यामुळे मनोरमा खेडकरचा जामीन फेटाळण्याची मागणी मूळ फिर्यादीचे वकील अॅड. अमेय बलकवडे यांनी केली आहे. याबाबत आज कोणता निर्णय समोर येणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

पूजा खेडकरला  सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला 

सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन नाकारला असून तिला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. यूपीएससीने दिल्ली पोलिसांकडे पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणात आता अजून कोण-कोण गोत्यात येणार याची उत्सुकता आहे. यूपीएससीने कारवाई करत पूजा खेडकरचे आयएएस पद काढून घेतलं असून तिला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास मनाई केली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तिचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे.

कोणत्याही क्षणी अटक होणार

यूपीएससीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करत पूजा खेडकरवर दिल्लीमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये आपल्याला अटक होऊ नये यासाठी पूजा खेडकरने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने नाकारला आहे. त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
Sunita Williams : 18 हजार फूट उंचीवर पॅराशूट खुली होणार, समुद्रात लँडिंग, सुनिता विलियम्सचा पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरु
Sunita Williams : 18 हजार फूट उंचीवर पॅराशूट खुली होणार, समुद्रात लँडिंग, सुनिता विलियम्सचा पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरु
पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य
Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Mahayuti : शिंदे, अजितदादा, देवेंद्र फडणवीसांनी कुदळ घेऊन औरंगजेबाची कबर उद्धवस्त करावीABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 18 March 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सPravin Datke on Nagpur Clash : नागपुरात राडा, पोलिसांवर गंभीर आरोप; भाजप आमदार प्रविण दटके EXCLUSIVENagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
Sunita Williams : 18 हजार फूट उंचीवर पॅराशूट खुली होणार, समुद्रात लँडिंग, सुनिता विलियम्सचा पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरु
Sunita Williams : 18 हजार फूट उंचीवर पॅराशूट खुली होणार, समुद्रात लँडिंग, सुनिता विलियम्सचा पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरु
पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य
Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य
Nagpur violence Devendra Fadnavis: ... त्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्यांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला!
... त्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्र्यांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सभागृहात सांगितला!
Multibagger Stock : 2 रुपयांच्या स्टॉकनं गुंतवणूकदार मालामाल, वर्षभरात 8000 टक्के रिटर्न, आता शेअर किती रुपयांवर?
2 रुपयांच्या पेनी स्टॉकची दमदार कामगिरी, वर्षभरात 8000 टक्के वाढ, सध्या शेअर कितीवर?
Pune Crime News : विहिरीत शीर, हात नसलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ अखेर उकललं! समलिंगी संबंधाची कुणकूण लागली, भेटायला बोलावलं अन्...; नेमकं काय घडलं?
विहिरीत शीर, हात नसलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ अखेर उकललं! समलिंगी संबंधाची कुणकूण लागली, भेटायला बोलावलं अन्...; नेमकं काय घडलं?
सलमान खानच्या फिल्मच्या सेटवर 'या' अभिनेत्रीला मिळायची घाणेरडी वागणूक; कित्येक वर्ष मनात ठेवल्यानंतर अखेर सोडलं मौन
सलमान खानच्या सेटवर 'या' अभिनेत्रीला घाणेरडी वागणूक; मौन सोडून केला धक्कादायक खुलासा
Embed widget