एक्स्प्लोर

Maharashtra Weather Update : पुणे, साताऱ्यात ऑरेंज अलर्ट; पुढील चार दिवस राज्यातलं हवामान कसं असेल?

पुढचे चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुणे : पुण्यासह राज्याला काल अवकाळी (Maharashtra Weather Update) पावसानं झोडपलं आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी दाणादाण उडाली आहे. मात्र पुढचे चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे.  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील  पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, नांदेड  जिल्ह्यांमध्ये ऑरेंन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  11 ते 15 जूनपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मागील काही दिवसांपासून राज्यात उकाडा वाढला होता. काही जिल्ह्यांनी चाळीशी पार केली होती. तर सोलापूर आणि पुण्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. मात्र या पावसामुळे अनेक जिल्ह्यातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवस  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख हवामान तज्ञ के.एस.होसाळीकरांनी ट्विटरच्या म्हणजेच एक्सच्या माध्यमातून दिली आहे. 

मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. याचमुळे खबरदारी म्हणून काही जिल्ह्यांना येलो तर काही जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. 

पुण्याला वादळी वाऱ्याच्या पावसानं झोडपलं!
 
पुणे आणि आजूबाजूच्या गावात काल संध्याकाळी चारच्या सुमारास वादळी वाऱ्याच्या पावसाने झोडपलं आहे. या पावसामुळे पुणेकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पुण्यात लोकसभेच्या निवडणुकींचं वारं सुरु आहे. त्यामुळे सभांचा धडाका सुरु आहे. मात्र या पावसामुळे कालच्या काही सभावर पाणी फेरल्याचं पाहायला मिळालं. आजदेखील पुण्यात अनेक राजकीय नेत्यांच्या सभा आणि रोड शो हणार आहेत. संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. त्यापूर्वी जर पुण्याला पावसानं झोडपलं तर सभा आणि रोड शो रद्द होण्याची शक्यता आहे. पुण्यात मतदानाच्या दिवशीदेखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

इतर महत्वाची बातमी-

मतदान करा अन्  निम्म्या किमतीत 'पॉट आईस्क्रीम खा; पुणेकरांसाठी खास ऑफर

Ravindra Dhangekar : निवडणुकीत भाजप सगळीकडे पोलिसांच्या मदतीने पैसे वाटणार; रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget