एक्स्प्लोर

Sharad Pawar: पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा काँग्रेस अन् भाजपला दणका! अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत 10 नगरसेवकांनी फुंकली तुतारी

NCP Sharad Pawar: आम्ही शरद पवार यांच्या विचाराचे पाईक असून यापुढे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणार असल्याचा दावा या नगरसेवकांनी केला आहे.

पंढरपूर: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपला दणका दिला आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांना आता पंढरपूर शहरातूनही मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. भाजप परिचारक गटाचे तीन तर भालके गटाच्या सात नगरसेवकांनी आज खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  

आम्ही शरद पवार यांच्या विचाराचे पाईक असून यापुढे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणार असल्याचा दावा या नगरसेवकांनी केला आहे. यामध्ये प्रताप गांगेकर हे माजी नगराध्यक्ष असून यामुळे अनिल सावंत यांची शहरातील ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या प्रवेशामुळे आता शरद पवार गटाने भाजप व काँग्रेस या दोघांनाही जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. या नगरसेवकांशिवाय अनेक दिग्गज जेष्ठ कार्यकर्त्यांनीही आज शरद पवार गटात प्रवेश केल्याने ऐन प्रचाराच्या काळात हा आमदार समाधान आवताडे व काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

पंढरपूर शहरामध्ये या नगरसेवकांची मोठी ताकद असून आता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे. या प्रवेशाचा फायदा अनिल सावंत यांना होणार असून खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे अनिल सावंत यांच्यासाठी ही जमवाजमव करू लागले आहेत. 

अनिल सावंत यांची प्रतिक्रिया

आज दहा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शरद पवारांवरती विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला आहे. पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. आमचा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भक्कमपणे पुढे येतोय. भाजप परिचारक गटाचे तीन तर भालके गटाच्या सात नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनी दिली आहे.

पंढरपूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसकडूनही उमेदवार

पंढरपुरात भाजपचे समाधान आवताडे व काँग्रेसचे भगीरथ भालके यांच्यात थेट लढत होईल अशी चर्चा होती. मात्र, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे सध्या तिहेरी लढत होणार असल्याचं चित्र आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
Sharad Pawar : लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
Nawab Malik ED Bail: निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिकांना झटका बसण्याची शक्यता, जामीन रद्द करण्याच्या हालचाली
निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिकांना झटका बसण्याची शक्यता, जामीन रद्द करण्याच्या हालचाली
मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar BJP Support : माहिममध्ये भाजपकडून सदा सरवणकरांचा प्रचार #abpमाझाSharad Pawar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवर शरद पवार यांची प्रतिक्रियाSolapur PM Modi Sabha : सोलापूरमध्ये आज पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंची प्रचार सभा #abpमाझाEknath Shinde On Uddhav Thackeray : मला जेलची धमकी देऊ नका, मी चळवळीतून आलोय- शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर रोहित पवार कडाडले; म्हणाले, महायुतीकडून जे चाललंय....
Sharad Pawar : लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
लोकसभेला 400 जागा कशासाठी? मोदींचा वेगळाच डाव होता; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, मनमोहन सिंग यांचं सरकार...
Nawab Malik ED Bail: निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिकांना झटका बसण्याची शक्यता, जामीन रद्द करण्याच्या हालचाली
निवडणुकीच्या तोंडावर नवाब मलिकांना झटका बसण्याची शक्यता, जामीन रद्द करण्याच्या हालचाली
मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
मुंबई हादरली, 10 भटक्या कुत्र्यांना ठार केलं अन् गोणीत भरुन नाल्यात टाकलं; धक्कादायक प्रकार समोर
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला धक्का बसणार? 8 आमदारांसोबत एक मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं खळबळ 
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाला धक्का बसणार? 8 आमदारांसोबत एक मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानं खळबळ 
काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारा आज थेट मातोश्रीवर, संतोष कटके घेणार उद्धव ठाकरेंची भेट!
काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणारा आज थेट मातोश्रीवर, संतोष कटके घेणार उद्धव ठाकरेंची भेट!
Raosaheb Danve : दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल! विरोधकांची टिकेची झोड, व्हिडिओतील कार्यकर्ता म्हणाला, 'त्यांच्या कानात मी...'
Maval Assembly constituency: मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
मावळमध्ये पुन्हा घबाड सापडलं, दुसऱ्यांदा मोठी रोकड जप्त, व्यावसायिकांकडे इतका पैसा येतो कुठून?
Embed widget