एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis : पुणे जिल्ह्यात कार्यकर्त्यांची अजित पवारांना पसंती; सुप्रिया सुळेंचं काय होणार?

पुणे जिल्ह्यात स्थानिक नेत्यांनी अजित पवारांना पसंती दिली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंचं काय होणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Maharashtra Political Crisis : बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे बारामती असे समीकरण गेली सहा दशके राज्यात आहे. परंतु आता हे समीकरण बदलणार का?, असा सवाल उपस्थित झाला आहे. अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीचा मार्ग खडतर झाला आहे का?, असा सवाल उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होमग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार? आणि पुणे जिल्ह्यात कुणाची ताकद किती?, याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी नगरसेवक, आमदारांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचे आगामी लोकसभा निवडणुकीत काय होणार? याच्या आता चर्चा रंगू लागल्या आहेत. 

'बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे बारामती'

बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे बारामती, असे समीकरण गेली सहा दशके राज्यात ओळखलं जातं. मात्र गेल्या तीन दशकापासून बारामतीचा कारभार शरद पवारांनी अजित पवारांच्या हातात सोपवला. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील यांचा थेट संबंध अजित पवारांशी येत गेला. परंतु अजित पवारांनी जेव्हा बंड केलं तेव्हा बारामतीतील सगळे पदाधिकारी अजित पवारांच्या पाठिशी उभे राहिले. आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी भाजपने चंग बांधला असताना अजित पवारांचं बंड सुप्रिया सुळे यांना आव्हान देणारं ठरणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

'... तर सुप्रिया सुळेंना फटका बसणार?

अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळे यांना आगामी लोकसभा निवडणुकी ही अवघड जाणार हे स्पष्ट आहे. दत्तात्रय भरणे, राहुल कुल, भीमराव तापकीर आणि स्वतः अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करतील तर संग्राम थोपटे आणि संजय जगताप हे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करतील का?, या बाबत शंका आहे. कारण आमदार संजय जगताप हे अजित पवारांमूळे निवडून आले आहेत तर संग्राम थोपटे आणि शरद पवारांचे संबंध सलोख्याचे नाहीत. त्यामुळे याचा फटका सुप्रिया सुळे यांना बसू शकतो. बारामतीत अजित पवारांनी आदेश दिला तर आगामी निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी दर्शवली आहे. 

'44 नगरसेवकांपैकी 38 ते 40 अजित पवारांसोबत'

सत्तानाट्यानंतर जी परिस्थिती बारामतीची आहे तीच परिस्थिती पुणे जिल्ह्यात देखील पाहायला मिळते आहे. पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे अजित पवारांच्या गोटात सामील झाले आहेत. पुणे महापालिकेच्या 44 नगरसेवकांपैकी 38 ते 40 अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशांत जगताप यांच्यासह जुन्या फळीतील काही पदाधिकारी शरद पवारांसोबत राहणार असले तरी अनेक नगरसेवक अजित पवारांसोबत गेल्याने शरद पवारांसमोर आव्हान असणार आहे.

'पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला...'

बारामतीनंतर पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र 2017मध्ये या बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावत, एकहाती सत्ता काबीज केली. तर मावळ लोकसभेत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचा शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी दारुण पराभव केला होता. त्यामुळं शिंदे, फडणवीस आणि पवार गट हे एकमेकांसमोर उभे ठाकणार, याची प्रचिती यायला सुरुवात झाली आहे. कधी काळी अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्ष पाहायला मिळतो तो भाजप, शिंदेंसोबत गेलेल्या खासदार श्रीरंग बारणेंमध्ये. आता हे सगळे परंपरागत विरोधक एकाच बाजूला आल्यामुळं वैर सोडून हे आपापसात किती गोडी गुलाबीने राहतात का?, याबाबत जनतेच्या मनात शंका आहे. मावळमधून लोकसभेची निवडणूक आपणच लढवणार, असं शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी जाहीर केलं तर पिंपरी आणि चिंचवड विधानसभा आम्हीच लढू तसंच महापालिकेवरदेखील पुन्हा आमचाच झेंडा फडकणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला.

शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दावे करत असताना भाजपमध्ये मात्र अचानकपणे त्याग आणि विरक्ती जागी झाली आहे. राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या दुफळी मुळे राज्यात, जिल्ह्यात आणि गावागावात राष्ट्रवादी काँगेस मध्ये फूट पडली आहे. आता आपलं काय ? असा प्रश्न कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पडला आहे.  मात्र पुणे जिल्ह्यात सुप्रिया सुळे यांचे लोकसभा निवडणुकीत काय होणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

 

'शरद पवारांपुढे 'हा' मोठा प्रश्न...'


शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणात आणलं आणि 1991 साली खासदार बनवलं. त्यानंतर अजित पवारांना आमदार, मंत्री आणि उपमुख्यमंत्री बनवले. तर दुसरीकडे बारामती, पुणे आणि राज्याचा कारभार शरद पवारांनी अजित पवारांकडे सोपवला होता. तिकीट वाटप, पक्षाचा कारभार यासंदर्भात अजित पवार निर्णय घेत होते. त्यामुळे नगर सेवक, आमदार, पदाधिकरी अजित पावरांसोबत असल्याचे दिसून आले. त्यामुळे शरद पवार लोकांमध्ये जावून लोकांचा कौल घेईल, असं म्हणत असताना सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी अजित पवारांच्या पाठीमागे उभा असलेल्या पदाधिकाऱ्यांचं काय करायचं?, हा प्रश्न शरद पवारांना सोडवावा लागणार आहे.

बारामती लोकसभा मतदार संघाचं समीकरण कसं आहे?

बारामती लोकसभा मतदार संघात विधानसभा मतदार संघाचे 6 मतदार संघ येतात.  बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर हवेली, भोर आणि खडकवासला,अशा सहा विधनसभा मतदार संघांचा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचे दोन, आणि भाजपचे दोन असे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अजित पवार आणि दत्तात्रय भरणे , काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि संजय जगताप भाजपचे राहुल कुल आणि भीमराव तापकीर, असे आमदार आहेत.अजित पवारांच्या बंडामुळे दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या बाजूला आहेत. भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि शरद पवारांचे संबंध सलोख्याचे नाहीत. पुरंदरचे आमदार संजय जगताप हे अजित पवारांमुळे निवडून आले आहे. भाजपचे राहुल कुल आणि भीमराव तापकीर आमदार आहेत. राहुल कुल यांच्या पत्नी 2019 साली कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी कांचन कुल यांचा 1 लाख 30 हजार मतांनी पराभव झाला होता. तर 2014 साली महादेव जानकर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यामध्ये जानकर यांचा 69 हजार 666 मताने पराभव झाला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सWaris Pathan Cried in Bhiwandi : सगळे हात धुवून मागे लागलेत, वारिस पठाण ढसाढसा रडले!Santaji Ghorpade attack : कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Embed widget