एक्स्प्लोर
महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2017: चंद्रहार, विक्रांत हरले!
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत धक्कादायक निकाल लागत आहेत.

पुणे: महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत धक्कादायक निकाल लागत आहेत. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पहिल्याच फेरीत पराभूत झाला. मॅट विभागात हिंगोलीच्या गणेश जगतापने चंद्रहारला धूळ चारली. याशिवाय माती विभागात 2014 चा उपमहाराष्ट्र केसरी मुंबईचा पैलवान विक्रांत जाधवही पहिल्याच फेरीत बाद झाला. विक्रांतला लातूरच्या सागर बिराजदारने लोळवलं. महाराष्ट्र केसरी LIVE
- #महाराष्ट्रकेसरी स्पर्धा 2017: ▶️उपमहापौर केसरी अभिजीत कटके आणि शिवराज राक्षे यांच्यातील कुस्तीत अभिजीत विजयी ▶️दुखापतीमुळे माघार घेतलेला शिवराज रुग्णालयात ▶️अभिजीतकडून खिलाडूवृत्तीचं दर्शन
- अभिजीत कटके वि. शिवराज राक्षे तुफान कुस्ती अभिजीत विजयी घोषित. दुखापतीमुळे शिवराजची माघार, अभिजीतच्या खिलाडूवृत्तीचंही दर्शन. स्वत: शिवराजवर उपचार.
- मोठी कुस्ती विलास डोईफोडे विजयी वि. अतुल पाटील.
- विलासनं अतुलला चीतपट केलं.
- माती विभाग माऊली जमदाडेचा योगेश पवारवर चीतपट विजय
आणखी वाचा























